उमवि परिक्षेत्रात विद्यार्थी नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा निर्धार

0
जळगाव । स्वच्छ भारत – उन्हाळी प्रशिक्षण : 100 तास स्वच्छतेसाठी या अभिनव उपक्रमामध्ये उमवि परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याचे उद्दीष्ट पुर्ण करण्यासाठीचा निर्धार जिल्ह्यातील तिनही अधिसभा सदस्यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

मानव संसाधन विकास मंत्रालय तसेच पाणी व स्वच्छता मंत्रालय यांच्या सहयोगाने स्वच्छता उपक्रम सामुहिक चळवळ होण्याच्या उद्देशाने स्वच्छ भारत – उन्हाळी प्रशिक्षण 100 तास स्वच्छतेसाठी या उपक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परिक्षेत्रात या उपक्रमात तरूणांचा अधिक सहभाग वाढावा यासाठी जळगाव, धुळे व नंदुरबार या तिनही जिल्ह्यात अधिसभा सदस्यांसमवेत जिल्हानिहाय बैठक आयोजित करण्यात आली होती.

दरम्यान विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र प्रशाळेत जळगाव जिल्ह्यासाठी झालेल्या बौठकीप्रसंगी जिल्ह्यातील अधिसभा सदस्य, प्राचार्य, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यकम अधिकारी, विद्यार्थी विकास अधिकारी व एन.सी.सीचे कमांडींग अधिकारी उपस्थित होते. या बैठकीस व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील,

प्रा.नितीन बारी, प्रभारी विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.एस.टी.इंगळे उपस्थित होते. या उपक्रमातून ग्रामीण भागात जनजागृती व्हावी आणि स्वच्छतेसाठी लोकांचा सहभाग वाढावा या उद्देशाने पथनाटय, रॅली, घनकचरा व्यवस्थापन असे अनेक उपक्रमाबाबत प्रा.मनोज पाटील व प्रा.दीपक सोनवणे यांनी सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रा.एस.टी.इंगळे यांनी केले. बैठकीचे सुत्रसंचालन प्रा.पंकजकुमार नन्नवरे यांनी केले तर आभार प्रा.दीपक सोनवणे यांनी मानले.

अडचणींवर मात करुन कार्य करा- दिलीप पाटील
ऑनलाईन नोंदणीसाठी येणार्‍या अडचणींवर मात करून कार्य करावयाचे आहे. यासाठी महाविद्यालयांमध्ये जाऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी प्रयत्न करावयाचे असल्याचे दिलीप पाटील यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*