तानाजी मालुसरे पुरस्काराने डॉ.दीपक पाटील यांचा गौरव

0
जळगाव । सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व वैद्यकिय क्षेत्रात विशेष कार्य केल्याबद्दल डॉ. दिपक पाटील यांना स्वराज केसरी तानाजी मालुसरे पुरस्कार देवून त्यांचा गौरव करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 344 व्या राज्यभिषेक दिनाचे औचित्य साधून या पुरस्कार सोहळ्याचे मुंबई येथील प्रभादेवी परिसरातील पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवाजी ज्ञानपिठाचे अध्यक्ष डॉ. हेमंत राजे गायकवाड,

भारतीय सेनेचे निवृत्त लेप्टनंट कर्नल महाराष्ट्र गौरव पुरस्कार विजेते व महाविर चक्र प्राप्त मोहन सामंत, अभिनेत्री शुभांगी जोशी उपस्थित होते. दरम्यान इंडियन मेडीकल असोसिएशनचे सरचिटणीस डॉ. दीपक पाटील यांना स्वराज्य केसरी तानाजी मालुसरे पुरस्कार

भारतीय सेनेचे पंजाबमधील ऑपरेशन ब्लूस्टारचे नायक कर्नल सुभाष हेरवाडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यानंतर उपस्थितांना शिवाजी द गे्रटेस्ट ही फिल्म दाखविण्यात आली.

LEAVE A REPLY

*