शिक्षकांनी इतरांसाठी आधार होण्याची गरज!

0
जळगाव । प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या कारणाने शिक्षक लक्षात राहतात. आदर्श शिक्षक व्हायचं असेल तर अगोदर विद्यार्थी व्हा, स्वतःला विद्यार्थ्यांच्या जागी अनुभव करून त्यांच्यासाठी आधार व्हा, असे प्रतिपादन स्पर्श संस्थेच्या उज्वला टाटीया यांनी केले.

विद्या इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षिकांसाठी आयोजित मागदर्शनपर कार्यशाळेत त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपिठावर शाळेचे मुख्याध्यापक हॅरी जॉन, माधवी थत्ते, मधुरा थत्ते, कामिनी भट आदी उपस्थित होते. यावेळी उज्वला टाटीया यांनी सांगितले की, शिक्षक होणे अभिमानास्पद बाब आहे, परंतु आपण कोणत्याही आधारशिवाय इतरांसाठी आधार व्हावे.

एकलव्यासारखे शिष्य आजच्या काळात नाही जे केवळ प्रतिमा ठेवून विद्या मिळवतील आणि दक्षिणा देतील. आजचे विद्यार्थी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त सामान्यज्ञाना विषयीचे प्रश्न देखील विचारतात. त्यादृष्टिने आपण देखील तयार असायला हवे. टी.व्ही. मालिका, मोबाईलमध्ये आपण तासनतास वेळ वाया घालवतो, त्याऐवजी प्रत्येकाने एक तास अवातंर वाचन करणे आवश्यक आहे. आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला नाही तरी चालेल, परंतु इतरांसाठी आदर्श व्हा. छडी लागे छमछम, विद्या येई घमघमचा काळ गेला, आज प्रेमाने समजाविल्यास विद्यार्थ्यांना लवकर आणि योग्य पध्दतीने समजते, असेही टाटीया यांनी सांगितले.

शिक्षक-पालकांसाठी आचारसंहिता
सहा वर्षाच्या बालकापेक्षा 1 वर्षाचे बोलक अधिक हुशार असल्याचे निर्देशनास आले आहे. आपले बोलणे, वागणे याकडे त्यांचे अधिक लक्ष असते. त्यामुळे घरात किंवा शाळेत इतर कोणत्याही ठिकाणी आपल्या आजूबाजुला लहान मुले असल्यास शब्दांचा जपून उपयोग करावा आणि आपले वागणे देखील योग्यच असावे, असा सल्ला उज्वला टाटीया यांनी दिला.

शिक्षिकांनी पोषाखावर लक्ष द्यावे
सध्या आजुबाजूला असणारे वातावरण, घडणार्‍या घटना, सोशल मिडीया, खानपानच्या सवयींचा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर प्रभाव पडतो. शाळेत किंवा घरी विद्यार्थ्यांसमोर वावरताना आपला पोषाख योग्य पध्दतीचा असावा. आपण देखील स्वतःच स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन उज्वला टाटीया यांनी केले.

LEAVE A REPLY

*