विद्यार्थिनींनी बनविले सौरऊर्जेवर चालणारे ऑटोमॅटिक बियाणे पेरणी यंत्र

0
जळगाव । शेतकर्‍यांना आपल्या शेतात आधुनिक पद्धतीचा अवलंब करुन पेरणी करता यावी. यासाठी एस.एस.बी.टी.च्या विद्यार्थिनीनी ऑटोमेटिक बियाण पेरणी यंत्र विकसीत केले आहे. या यंत्रामुळे शेतकर्‍यांना पेरणीसाठी करावी लागणारे श्रम काही प्रमाणात हलके होणार असल्याचे विद्यार्थीनींनी सांगितले.

शेतात पारंपरिक पेरणी पध्दतीने पेरणी केल्यास त्यामूळे अनेक अडचणी निर्माण होत असतात. यामध्ये पेरणीसाठी मजूर न मिळणे, बियांची नासाडी, व्यवस्थित पेरणी न होणे व पिकांची वाढ व्यवस्थित न होणे. अशा अडचणींना शेतकर्‍यांना सामोरे जावे लागत असते.

दरम्यान शेतकर्‍यांच्या या अडचणी लक्षात घेवून एस. एस. बी. टी. अभियांत्रिकातील इ ऍण्ड टी सी विभागाच्या शेवटच्या वर्षातील हर्षदा झोपे, किरण कुलकर्णी, निकिता सिंग व रेश्मा झोपे यांनी सोलर ऊर्जेवर चालणारे ऑटोमॅटिक बियाणे पेरणी यंत्र या विद्यार्थिनींनी तयार केले आहे. हा प्रकल्प तयार करण्यासाठी त्यांना प्रा. दिपीका पाटील, प्रा.अमोल वाणी व विभाग प्रमुख डॉ. एस. आर. सुरळकर यांनी मार्गदर्शन केले.

अशा प्रकारे होते यंत्राद्वारे पेरणी
विद्यार्थीनींनी तयार केले बियाणे पेरणीचे यंत्र पूर्णपणे ऑटोमॅटिक असून सौरऊर्जे वर काम करते. तसेच हे यंत्र निश्चित केलेल्या ठराविक अंतरावर थांबेल. त्यानंतर थांबलेल्या खोदकाम करुन मशीनच्या साहाय्याने त्यात बियाणांची पेरणी करण्यात येईल. त्यानंतर बियाणांवर माती पसरवेल.

नंतर परत ते पुढे जाऊन निश्चित केलेल्या अंतरावर थांबेल व प्रकिया पूर्ण करेल. बिया पेरणीच्या वेळेस रस्त्यात काही अडथळा आल्यास यंत्र सेन्सर आपल्याला एक बझर देईल. त्याचा उपयोगाने आपण यंत्रास निर्माण झालेला अडथळा बाजूला करू शकतो. तसेच या यंत्रात जीपीएस प्रमाणालीचा वापर करुन कोणत्याही आकाराच्या क्षेत्रात बियाणे पेरणी करणे शक्य होणार आहे.

LEAVE A REPLY

*