जिल्ह्यात सुरु होणार ‘स्वच्छतेचा महाजागर’

0
जळगाव । जिल्हाभरात दि.26 ते 10 फेब्रुवारीपर्यंत स्वच्छतेबाबत प्रबोधन करण्यासाठी ‘स्वच्छतेचा महाजागर’ उपक्रम राबविण्याचा निर्धार जिल्ह्यातील वारकर्‍यांनी केला आहे.

जि.प.पाणीपुरवठा, स्वच्छता विभाग व वारकरी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छतेचा महाजागर उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज जि.प.च्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात बैठक झाली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजन पाटील, हभप नरहरी महाराज चौधरी, हभप अंकुश महाराज, आरोग्य अधिकारी बबीता कमलापुरकर उपस्थित होते.

पर्यावरणाचा समतोल राखणे काळाची गरज आहे. त्यामुळे समाजात जनजागृती करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांनी केले. स्वच्छतेचे महत्व हे अध्यात्माशी जोडून सर्व वारकरी यांनी स्वच्छतेचा महाजागर व्यापक प्रमाणात यशस्वी करुन दाखविण्याचे आवाहन हभप नरहरी महाराज चौधरी यांनी केले.

प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजन पाटील यांनी केले. सुत्रसंचलन निलेश रायपूरकर यांनी केले. यावेळी जिल्हाभरातील वारकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*