‘प्लास्टिकमुक्त जळगाव’ करण्याचा संकल्प करा!

0
जळगाव । प्लास्टिकमुळे होणार्‍या र्‍हास टाळण्यासाठी शासनाने प्लास्टिकवर बंदी घातली आहे. प्रत्येकाने प्लास्टिक पासून होणारे तोटे लक्षात घेवून त्यापासून पर्यावरणाला कसा धोका पोहचतो. हे समजून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे प्लास्टिकचे दूष्परिणाम लक्षात घेवून प्रत्येकाने प्लास्टिकमुक्त जळगाव करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केेले.

एकता रिटेल किराणा मर्चंटस् पतसंस्था आणि जळगाव महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने वापरू या कापडी पिशवी आजपासून या उपक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मनपा आरोग्य अधिकारी उदय पाटील, पतसंस्थेचे अध्यक्ष ललित बरडीया, उपाध्यक्ष घनश्यामदास आडवाणी उपस्थित होते. याप्रसंगी ते बोलत होते.पुढे बोलतांना श्री. निंबाळकर म्हणाले की, प्रत्येक महिलेने आपल्या घरातून बाहेर पडणार्‍या व्यक्तीला त्यांच्या सोबत एक कापडी पिशवी द्यायला हवी.

तसेच शहरातील चहाविक्रेत्यांनी प्लास्टिकचा कपांचा वापर न करता त्यांनी चिनीमातीच्या कपाचा वापर करुन पर्यावरणाच्या संवर्धनासाठी हातभार लावण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. त्यानंतर महापौर ललीत कोल्हे, माजी महापोर ललित कोल्हे यांनी मनोगत व्यक्त केले.

दरम्यान प्रास्ताविकात ललित बरडीया यांनी उपक्रमाचे तीन टप्पे सर्वांसमोर मांडले. त्यानंतर उपस्थितांना कापडी पिशवीचे वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सूत्रसंचलन पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रणिता कोलते यांनी केले. यशस्वीतेसाठी दिलीप झाबक, सचिन चोरडीया, सुभाष तोतला, चंद्रप्रकाश सांखला, सुदर्शन बरडिया, सुभाष कासट, सुभाष कांकरिया, रमेश कांकरीया, तुलसीदास आहुजा, अशोक आहुजा, धनराज चावला, वसीम काझी, अमर कुकरेजा, अमीत भावनानी, योगेश बारी, सप्नील सिनकर, अरविंद संत यांनी परिश्रम घेतले.

कापडी पिशवी आणणार्‍यांना भेटवस्तू वाटप
बाजारात कापडी पिशवी घेवून आलेल्या सुजाण पर्यावरणप्रेमी नागरिकांना एकता पतसंस्थेतर्फे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, महापौर ललीत कोल्हे, माजी महापौर नितीन लढ्ढा, पतसंस्थेचे अध्यक्ष ललीत बरडिया, उपाध्यक्ष घनश्यामदास आडवाणी यांच्या हस्ते त्या नागरिकांचा भेटवस्तू देवून त्यांचा सन्मान करण्यात आला.

प्रत्येकाने पर्यावरण संवर्धनाची जाणीव ठेवावी – माजी महापौर नितीन लढ्ढा
पर्यावरणाचा दिवसेंदिवस होत असलेला र्‍हास जागतिक समस्या बनली आहे. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने काहीतरी करणे आवश्यक आहे. प्रत्येकवेळी नागरिकांनी मनपाकडून अपेक्षा ठेवणे चूकीचे असून पर्यावरण संवर्धनाची प्रत्येकाने जाणीव ठेवायला हवी. असल्याचे माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी केले.

LEAVE A REPLY

*