देशात सुख-शांतीसाठी बोहरा समाजबांधवांकडून नमाज पठण

0
जळगाव । देशात सुख-शांती नांदत रहावी. आणि चांगला पाऊस पडून देश सुजलाम सुफलाम व्हावा. यासाठी नमाज पठण करुन बोहरा समाजबांधवानी प्रार्थना केली. दरम्यान समाजबांधवांसह बच्चे कंपनीनी एकमेकांना शुभेच्छा देत रमजान ईद उत्साहात साजरी केली.

बोहरा बांधवांतर्फे आज रमजान ईद साजरी करण्यात आली. दरम्यान सकाळी 6.30 वाजता शहरातील भवानी पेठेतील जैनी मस्जीद तर शिवाजी नगरातील हूसामी मस्जीद मध्ये रमजान ईदची नमाज अदा करण्यात आली. त्यानंतर बोहरा समाजाचे धर्मगुुरु सैय्यदना मूफद्दल सैफूद्दीन साहेब यांच्या मार्गदर्शनातून परमेश्वराकडे प्रार्थन करण्यात आली. तसेच धर्मगुरु सैय्यदना मूफद्दल सैफूद्दीन साहेब यांनी सांगितले की,

प्रत्येक बोहरी समाजबांधवाच्या घरात एक जणाने तरी तोंडी पाठ कूराण पाठ करावे. तसेच प्रत्येक समाजबांधवाने जास्तीत जास्त वृक्षरोपन करुन व प्रत्येक तीन महिन्यांनंतर येणार्‍या मोहरम सणामध्ये 10 दिवस प्रवचनाचे आयोजन करण्याचे आवाहन धर्मगुरुंनी समाजबांधवांना केले. तसेच आपल्या सार्वजनिक जीवनात जेवण करीत असतांना एकही अन्नाचा कण वाया जावू नये

म्हणून दाणाकमीटीची रमजान महिन्यात उत्तम सेवा केल्याबद्देल त्यांचा बक्षिस देवून सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे समाजाची सेवा केलयाबद्दल मोहीज खरगोनवाला, मुतूजा इज्जी, बालासिनोरवाला आणि फकरु टेकडीवाला यांना समासेवेची तीन पदे देण्यात आली. तसेच सर्वसमाजबांधवांना जुजर मास्टर यांच्या परिवाराकडून शिरखूरमा वाटप करण्यात आला.

यावेळी सर्व समाजबांधवांसह लहान मुलांनी नवीन कपडे परिधान करुन एकमेकांना गळे भेट घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सैफुद्दीन अमरावतीवाला, युसूफ मकरा, मोईज खामगाववाला, सैफुद्दीन अमरेलीवाला, अब्दुलकादर भावनगरवाला, गुलामअब्बास लेहरी, डॉ. मुरतुझा अमरेवाला यांच्यासह सर्व बोहरी समाजबांधव मोठ्या संख्यने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*