चिमुकलीचा बळी घेणार्‍याला फाशीची शिक्षा द्या!

0
जळगाव । समता नगरातील नऊ वर्षीय बालिकेचा बळी घेणार्‍या आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी अशा मागणीचे निवेदन मेहतर समाजासह मनपाच्या सफाई कामगारांनी आज जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना दिले.

समता नगरातील नऊ वर्षीय बालिकेचा मृतदेह काल दि. 13 रोजी गोणपाटात आढळुन आला. अत्याचार आणि नरबळीचा हा प्रकार असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असुन या घटनेचा मेहतर समाजासह सफाई मजदुर संघातर्फे तीव्र निषेध करण्यात आला आहे.

माणुसकीला काळीमा फासणारे हे कृत्य करणार्‍या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच या खटल्याचे काम विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडे सोपविण्यात यावे अशी मागणीही जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदन देतेवेळी अजय घेंगट, युवाशक्तीचे विराज कावडीया, जितु करोसीया, राजू ढंडोरे, आनंद गोयर, संजय ढंडोरे, नितीन जावळे, राजेश गोयर, प्रविण जावळे, राहुल चव्हाण, साईल जावळे, प्रथम गोयर, कन्हैय्या करोसीया, विशाल सोनवाल, पुनमचंद गोयर,किशोर करोसीया, जयंत चव्हाण आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*