महावितरणच्या नशिराबाद उपविभागातील अभियंत्यावर मानहानीचा दावा दाखल करणार!

0
जळगाव । महावितरणच्या नशिराबाद उपविभागातील उपकार्यकारी अभियंता यांनी शेतकर्‍यांकडून कृषीपंपसाठी पैशांची मागणी केली होती. तसेच उलट शेतकर्‍यांवर वीजचोरी केल्याचा खोटा आरोप करीत त्यांच्यावर वीजचोरीचा गुन्हा दाखल केला होता.

त्यामुळे शेतकर्‍यांची फसवणूक झाली असून पोलिसात खोटी तक्रार केल्याप्रकरणी संबंधित अभियंत्यांविरुद्ध मानहाणीचा दावा दाखल करणार असल्याचा इशारा शेतकरी प्रदिप भोळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.

आसोदा शिवारांतर्गत मन्याखेडा अंतर्गत प्रदिप भोळे यांचे शेत आहे. त्यांच्या शेतात बोअर खोदकाम केल्यानंतर शेतीपंपाकरीता वीजपुरवठा मिळावा. यासाठी दि. 20 डिसेंबर 2017 रोजी नशिराबाद उपविभागात भोळे यांनी इस्टिमेट सादर केले होते. परंतु अर्ज करुन सहा महिने उलटले तरी पंपकनेक्शन मिळत नव्हते.

दरम्यान उपकार्यकारी अभियंता विशाल खंडारे यांनी वीज हजार रुपये द्या. मी तुम्हाला मी तुम्हाला कनेक्शन देवून त्याचसोबत डिमांड नोट देणार असल्याचे संबंधित शेतकर्‍यांना सांगितले. यावर शेतकर्‍यांनी आपल्या शेतात स्वखर्चाने पोल उभे करुन उपकार्यकारी अभियंता यांना दहा हजार रुपये दिले. दरम्यान महिन्याभरानंतर अभियंता खंडारे यांनी पोलवर वीजपुरवठा जोडून दिला. त्यानंतर उरलेल्या 10 हजारांची मागणी शेतकर्‍यांकडे करण्यात आली. परंतु दहा ते बारा वेळा उपविभागात जावून विशाल खंडारे यांना डिमांड नोटची मागणी शेतकरी प्रदिप भोळे यांनी केली असता.

त्यांना आधी माझे पैसे द्या त्यानंतर तुम्हाला डिमांड नोट देतो असे सांगितले. त्यानंतर डिमांडनोट घेण्यासाठी प्रदिप भोळे गेले असता. त्यांच्या हातात वीजचोरीचे बिल देण्यात आले. तसेच उपकार्यकारी अभियंता विशाल खंडारे व सहाय्यक अभियंता माधूरी पाटील यांनी संगनमत करुन वीजचोरी केल्याप्रकरणी शेतकर्‍यांवर खोटा गून्हा दाखल करण्यात आला होता.

त्यामुळे खोटी बातमी प्रसिद्ध करुन बदनामी केल्याप्रकरणी संबंधित अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच खोटी तक्रार केल्यामुळे मानहानीचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा शेतकरी प्रदिप भोळेे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला. तसेच न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालय व महावितरणसमोर उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

LEAVE A REPLY

*