मतदार यादीवर दीड हजाराच्या वर हरकती!

0
जळगाव । महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारुप मतदार यादीवर 1500 च्यावर हरकती प्राप्त झाल्या. हरकती स्विकारण्याची अंतिम मुदत असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत नोंदणी करण्याचे सुरु होते. दरम्यान प्रभाग 5 मध्ये 2239 मतदार बोगस असल्याची हरकत अ‍ॅड.विजय पाटील यांनी घेतली असून घरोघरी जावून पाहणी करण्याची मागणी केली.

मनपाच्या आगामी निवडणुकीसाठी राज्य निवडणुक आयोगाच्या निर्देशान्वये मनपा प्रशासनाने प्रारुप मतदार यादी जाहीर करुन हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या. आज हरकत घेण्यासाठी अंतिम मुदत असल्यामुळे महापालिकेच्या 13 व्या मजल्यावर हरकतधारकांची गर्दी झाली होती. सायंकाळी 5.45 वाजेपर्यंत हरकती स्विकारण्यात आल्या. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत प्रभागनिहाय हरकती नोंदणी करण्याचे काम सुरु होते. जवळपास 1500 च्या वर हरकती प्राप्त झाल्या आहेत.

व्हिडीओ चित्रीकरणाद्वारे पाहणी करावी
प्रभाग क्र.5 मध्ये 2239 मतदार बोगस असल्याची हरकत अ‍ॅड.विजय पाटील यांनी दाखल केली असून व्हिडीओ चित्रीकरणाद्वारे घरोघरी जावून पाहणी करावी आणि नंतरच अंतिम यादी जाहीर करावी. अशी कायदेशीर हरकत अ‍ॅड.पाटील यांनी दाखल केली आहे.

हरकती नोंदणीचे काम उशिरापर्यंत
मतदार यादीवर हरकत दाखल करण्याची आज अंतिम मुदत होती. त्यामुळे महापालिकेत हरकत दाखल करण्यासाठी गर्दी झाली होती. नगरसेवक सुनिल माळी, पृथ्वीराज सोनवणे, चेतन शिरसाळे यांच्यासह इच्छुकांनी देखील हकरती दाखल केल्या. तेजस श्रीश्रीमाळ यांनी प्रभाग क्र.16 मध्ये 2247 मतदारांबाबत हरकती घेतली. मनपा कर्मचार्‍यांनी 5.45 वाजेपर्यंत हकरती स्विकारुन रात्री उशिरापर्यंत नोंदणी करण्याचे काम सुरु होते. त्यामुळे हरकतींची अंतिम आकडेवारी मिळु शकले नाही. मात्र दि.6 जून ते आजतागायत जवळपास 1500च्या वर हरकती प्राप्त झाल्याची माहिती मिळाली.

प्रभाग 5 मध्ये लोकसंख्येपेक्षा मतदारांची संख्या अधिक
प्रभाग क्र.5 मध्ये 24 हजार 162 लोकसंख्या निर्धारित करण्यात आली आहे. तर मतदारांची संख्या 27 हजार 162 आहे. लोकसंख्येपेक्षा तब्बल 8 हजार मतदारांची संख्या अधिक असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

*