स्कूल चले हम..!

0
जळगाव । तब्बल दोन महिन्यांच्या उन्हाळी सुट्ट्यानंतर उद्या सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांना सुरुवात होणार आहे. शाळेचा पहिला दिवस प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अविस्मरणीय रहावा. यासाठी शाळा प्रशासनाकडून प्रत्येक विद्याथ्याचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार असून उद्यापासून सर्व शाळांची घंटा खणखणायला सुरुवात होणार आहे.

प्रत्येकाला शाळेविषयी आकर्षण निर्माण व्हावे. तसेच शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांचा टक्का वाढावा. यासाठी शिक्षण विभागाकडून शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करुन शाळेचा पहिला दिवस प्रत्येक विद्यार्थ्यांला अविस्मरणीय व्हावा. यासाठी सर्व शाळांना शिक्षण विभागाकडून सुचना देण्यात आल्या आहेत.

त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वागत अभिनव पद्धतीने केले जाणार आहे. त्यासाठी सर्व शाळेच्या प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे. यामध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेचा परिसर स्वच्छ करून, सुंदर रंगरंगोटी करण्यात आली आहे. तसेच दोन महिन्यांच्या प्रदिर्घ उन्हाळ्याच्या सुट्ट्यांनंतर आता विद्यार्थ्यांना देखील शाळेची ओढ लागली आहे. त्यामुळे उद्या पासून सुरु होणार्‍या सर्व शाळांमध्ये पुन्हा विद्यार्थ्यांचा किलबिलाटासह शाळेची घंटा तब्बल दोन महिन्यानंतर पुन्हा खणखणार आहे.

पुष्पगुच्छ देवून होणार विद्यार्थ्यांचे स्वागत
शाळेचा पहिला दिवस प्रत्येक विद्यार्थ्याच्या लक्षात रहावा. यासाठी शिक्षण विभागाकडून प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वागत हे त्या विद्यार्थ्याला पुष्प गुच्छ देवून व ढोल-ताशाच्या गजरात करण्याचे आवाहन शिक्षण सभापती पोपटतात्या भोळे यांनी केले होते. त्यानुसार उद्या दोन्ही विभागाती विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी शाळा व्यवस्थापन सज्ज झालेे असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

LEAVE A REPLY

*