अपघातग्रस्तांसाठी पाळधी येथे अद्ययावत रुग्णवाहिका मंजूर

0
जळगाव । राष्ट्रीय महामार्ग क्र.6 वरील एकलग्न – पाळधी बायपास व जळगाव या महामार्गावर अपघात ग्रस्तांचे प्रमाण जास्त असल्यामुळे रुग्णांच्या सेवेसाठी सहकार राज्यमंत्री तथा शिवसेना उपनेते ना.गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांतून पाळधी येथे अद्ययावत रुग्णवाहिका मंजूर करण्यात आली आहे.

आपत्कालीन वैद्यकीय सेवा प्रकल्पांतर्गत जिल्ह्याकरिता एकूण 34 रुग्णवाहिका शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. पाळधी – जळगांव या महामार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्तांना रुग्णवाहीका वेळेवर उपलब्ध होत नसल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे.

ही बाब लक्षात घेत ना. गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे प्रकल्प संचालकांशी चर्चा करून रूग्णवाहीका उपलब्ध करून देण्याची सुचना केली होती. त्यानुसार ठाणे येथील अद्यावत 108 ची रुग्णवाहिका पाळधी ता.धरणगाव येथे तात्काळ उपलब्ध करण्याचे आदेश दिले आहे.

रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्याबाबत पाटील यांनी सतत आरोग्यमंत्री, सचिव व आरोग्य संचालक यांच्याशी वार्तालाप करून व 2 वेळा मंत्रालयात बैठका घेतल्या. त्यांच्या सततच्या पाठपुराव्याने पाळधी येथे 108 ची अद्यावत रुग्णवाहिका मंजूर करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*