जिल्ह्यात 21 लाख वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट

0
जळगाव । दि.29 । प्रतिनिधी-सध्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा र्‍हास मोठा प्रमाणात होत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने पर्यावरणाचे महत्व लक्षात घेऊन 21 लाखांचे उद्दीष्ट पुर्ण करण्यासाठी वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत केले.
चार कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमातंर्गत आढावा घेण्यासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वतयारी आढावा बैठक घेण्यात आली.

बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, वन विभागाचे उप वनसंरक्षक आदर्श रेड्डी, एस. एस. दहिवले, उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संतोष पाटील, जिल्हा निबंधक सहकारी संस्था विशाल जाधवर उपस्थित होते.

दि. 1 ते 7 रोजी पर्यंत जिल्हयात 21 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना 4.31 लाखाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

तसेच जिल्हयात आतापर्यंत वृक्ष लागवडीसाठी 23 लाख 66 हजार 993 खड्डे तयार असल्याची माहिती उपवनसंरक्षक श्री. रेड्डी यांनी दिली.

जिल्हयात अधिक प्रमाणात वृक्ष लागवड होण्यासाठी शासकीय यंत्रणांना मोफत रोपे वाटप करण्यात येणार आहे. तसेच तालुकानिहाय शासकीय यंत्रणांना रोपे उपलब्ध होण्यासाठी रोपवाटिका व समन्वयक निश्चित करुन दिले असल्याची माहिती जिल्हाधिकार्‍यांनी दिली.

स्टॉलवर रोपांचे वितरण
प्रत्येक नागरिकाला वृक्ष लागवडी करण्यासाठी रोपे उपलब्ध व्हावी, याकरिता रोपे आपल्या दारी या उपक्रमातंर्गत प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तसेच शहरात जिल्हाधिकारी व उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळ रोपे विक्री केंद्र सुरु करण्यात आले आहे.

या संघटना होणार सहभागी
शासनाने राबविलेल्या वृक्षरोपण कार्यक्रमात धर्माधिकारी प्रतिष्ठाण, वन्यजीव संरक्षण संस्था, छत्रपती शिवाजी पर्यावरण व शेती विकास प्रतिष्ठाण, बायोलॉजिस्ट आयडीयल ऑर्गनाझेशन, समर्पण संस्था, रोटरी क्लब वेस्ट, न्यू कंझरर्व्हर संस्था, मानद वन्यजीव रक्षक, संयोग वृक्ष संवर्धन संस्था, मातृभूमी सर्वांगीण विकास संस्था, संपन्न फाऊंडेशन, साने गुरुजी फाऊंडेशन, आदि स्वयंसेवी संस्था स्वयंस्फुर्तीने या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

 

LEAVE A REPLY

*