कोलंबियाच्या फूटबॉल खेळाडूची गोळीबारात हत्त्या

0
बोगोटा । कोलंबियाचा फुटबॉल खेळाडू अलेजेंड्रो पेनारांदाची काल गोळी मारून हत्या करण्यात आली जेव्हा की त्याचा साथीदार खेळाडू हीस्सेन इजीक्वेर्दो या घटनेत जखमी झाला.

कोलंबियाचे सेकेंड डिविजन लीगचा संघ डेपोर्टिवो तुलुआने खेळणारा पेनारांदा गोळीबारादरम्यान जखमी झाला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.

‘ईएसपीएनएफसी’ ने क्लबद्वारे दिलेल्या वक्तव्याच्या हवाल्याने 24 वर्षीय फॉरवर्डच्या मृत्यूची पुष्टी केली.

पोलिस कमांडर ह्यूगो कासोसने म्हटले मध्यरात्री एक पार्टीमध्ये ही घटना घडली. यात अनेक फुटबॉल खेळाडू समाविष्ट होते.

क्लबच्या वक्तव्यानुसार एक पुरुष, एक महिलेविषयी विचारत आला आणि काही सेकंदनंतर त्याने गोळी चालवणे सुरू केली ज्यामुळे एक व्यक्तीचा मृत्यू झाला आणि इतर एक जण जखमी झाला.

सुरूवातच्या चौकशीनुसार हा हल्ला अलेजेंड्रो व हीस्सेनवर करण्यात आला होता. हे मानले जात आहे की या घटनेत एक महिला समाविष्ट आहे. तीला पार्टी मध्ये उपस्थित असायला पाहिजे होते परंतु ती तेथे नव्हती. पोलिस याला प्रेम संबंधातून झालेली हत्या मानतअसून त्या दृष्टीने तपासाला गती देण्यात आली आहे.

त्रिकोणी प्रेम प्रकरणात नेमके काय घडले याचा तपास पोलीस करीत असून पार्टीत अनुपस्थित असलेल्या त्या महिलाचा शोध घेत आहेत. ही महिला सापडल्यानंतर गुन्हाच्या कारणाचा उलगडा होईल असे पोलिसांना वाटत आहे.

LEAVE A REPLY

*