भ्रष्टाचाराचे सगळे पुरावे द्या!

0
दुबई । भारत, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांचा समावेश असलेल्या कसोटी सामन्यांत खेळपट्टी बदलण्याचा प्रयत्न मॅचफिक्सर्सनी केल्याचा दावा करणार्‍या अल जझिरा वाहिनीला त्यांनी यासंदर्भात केलेल्या स्टिंग ऑपरेशनची संपूर्ण माहिती पुरविण्याची विनंती आयसीसीने केली आहे. आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड रिचर्डसन यांनी पुन्हा एकदा या वाहिनीला ही विनंती केली.

आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी विभागाचे प्रमुख अ‍ॅलेक्स मार्शल यांनी म्हटले आहे की, आयसीसीला या स्टिंग ऑपरेशनची संपादित न केलेली प्रत हवी आहे पण अल जझिरा त्यासाठी सहकार्य करत नाही. रिचर्डसन यांनी जझिराला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, क्रिकेटमधील भ्रष्टाचारासंदर्भात जी माहिती तुमच्याकडे असेल ती आम्हाला द्यावी.

आम्ही त्यावर सखोल चौकशी करू. त्यातून कोणतेही मुद्दे निसटणार नाहीत, याचीही आम्ही काळजी घेऊ. पण त्यासाठी या वाहिनीने जे स्टिंग ऑपरेशन केले आहे, त्याचे पुरावे आम्हाला हवेत. ही माहिती दिल्यानंतर त्याचे स्त्रोत उघड केले जातील, अशी भीती जर वाहिनीला वाटत असेल तर त्याची भीती बाळगू नये.

अल जझिराने गेल्या आठवड्यात या स्टिंग ऑपरेशनचा छोटा हिस्सा लोकांपर्यंत पोहोचवून क्रिकेटमध्ये खेळपट्टी बदलण्याचा प्रयत्नही मॅचफिक्सर्सकडून केला जाऊ शकतो, हे दाखविण्याचा प्रयत्न केला. त्यात मुंबईतील क्रिकेटपटू रॉबिन मॉरिसचाही संबंध असल्याचे म्हटले होते. भारत-श्रीलंका, भारत-ऑस्ट्रेलिया व भारत ऑस्ट्रेलिया या सामन्यांत खेळपट्टीत बदल करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. त्या व्हीडिओमध्ये काही इंग्लिश व ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंची नावेही घेतली गेली पण ती ऐकू येणार नाहीत याची काळजी घेतली गेली.

LEAVE A REPLY

*