टेनिसप्रेमींमध्ये मात्र नाराजीचा सूर

0
पॅरिस । टेनिस विश्वात सेरेना विल्यम्सची सध्या चर्चा रंगली आहे. ही चर्चा तिच्या टेनिस पुनरागमनाची नसून तिने परिधान केलेल्या कपड्यांचीच जास्त आहे. कारण सध्या सुरू असलेल्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत सेरेनाने ‘ब्लॅक पँथर’ या सुपर हिरोचा ड्रेस परिधान केल्याचे पाहायला मिळाले. मात्र टेनिस प्रेमींनी तिच्या या परिधानाविषयी सोशल नेटवर्किंग साईटव्दारे नाराजी व्यक्त केली आहे.

सेरेना आई झाल्यानंतर पहिल्यांदाच या स्पर्धेत पुनरागमन करत आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात सेरेनाने झेक प्रजासत्ताकच्या क्रिस्टिना प्लिस्कोवावर 7-6, 6-1 असा विजय मिळवला. या सामन्यानंतर सेरेनाच्या ‘ब्लॅक पँथर’ या ड्रेसबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली. पण सेरेनाने मात्र आपण ‘ब्लॅक पँथर’ ड्रेसमध्येच खेळणार असल्याचा निर्धार केला आहे. सेरेनाच्या चाहत्यांना मात्र तिचा हा नवा लुक भलताच आवडला आहे.

ब्लॅक पँथर ड्रेसमध्ये कुठलीही अश्लिलता नाही. हा ड्रेस परिधान केल्यावर मला सुपर हिरो झाल्यासारखे वाटते. त्यामुळे मी ‘ब्लॅक पँथर’ ड्रेस परिधान करणारच, असे सेरेनाने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

*