टि-20 : वेस्टइंडीजचा विश्व एकादशवर विजय

0
लंडन । आपले फलंदाज आणि गोलंदाजाच्या चांगल्या प्रदर्शनाच्या बळावर वेस्टइंडीजने काल येथे खेळलेल्या सहायतार्थ टी-20 सामन्यात विश्व एकादशला 72 धावांनी हरवले.

विश्व एकादशने नाणेफक जिंकून पहिल्यांदा गोलंदजीचा निर्णय घेतला. वेस्टइंडीजने 20 षटकात चार गडी बाद 199 धावा बनवल्या. प्रत्युत्तरात विश्व एकादश संघ 16.4 षटकात सर्व गडी गमाऊन 127 धावा बनवू शकला. विश्व एकादशकडून थिसिरा परेराने 37 चेंडूत सात चौकार आणि तीन षटकारच्या मदतीने 61 धावांची खेळी खेळली. दुसरा कोणताही फलंदाज त्याची साथ देऊ शकला नाही.

तमीम इकबाल (2), ल्यूक रोंची (0), सॅम बिलिंग्स (4), दिनेश कार्तिक (0), शोएब मलिक (12), कर्णधार शाहिद अफ्रिदी (11), राशिद खान (9) आणि मिशेल मॅक्लेघन (10) ने निराश केले.

वेस्टइंडीजकडून केसरिक विलियम्सने 42 धावा देऊन तीन गडी बाद केले जेव्हा की आंद्रे रसेल आणि सॅमुएल बद्रीने दोन-दोन गडी बाद केले. बद्रीने तीन षटकात मात्र चार धावा खर्च केल्या. वेस्टइंडीजने यापूर्वी एविन लेविसचे 58 धावांच्या मदतीने 199 धावांचा विशाल स्कोर उभा केला. मार्लन सॅमुएल्सने 43, दिनेश रामदीनने नाबाद 44 आणि रसेलने नाबाद 21 धावा बनवल्या.

लेविसने आपल्या 26 चेंडुच्या तेज खेळीत पाच चौकार आणि इतकेच षटकार लावले. सॅमुएल्सने 22 चेंडूवर दोन चौकार आणि चार षटकार मारले जेव्हा की रामदीनने 25 चेंडूत तीन चौकार आणि तीन षटकार मारले. रसेलने 10 चेंडुचा सामना करून तीन षटकार लावले.

विश्व एकादशकडून राशिद खानने 48 धावा देऊन दोन गडी बाद केले. अफ्रिदी आणि मलिकलाही एक-एक यश मिळाला.
लेविसला सामनावीर निवडण्यात आले. हा सामना हरिकेनने प्रभावित लोकांच्या मदतीसाठी खेळण्यात आला होता.

LEAVE A REPLY

*