सामना सुरु असताना चक्क मैदानात उभे राहून केली कॉमेंट्री

0
नवी दिल्ली । क्रिकेट या खेळात समालोचनाला आणि समालोचकाला अन्यसाधारण महत्व आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये समालोचन हे मैदानाबाहेर असलेल्या स्टुडिओमधून केले जाते. मात्र काल लॉर्डवर झालेल्या प्रदर्शनीय सामन्यात वेगळेच चित्र पाहायला मिळाले.

इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन हा सामना चालू असताना चक्क मैदानात यष्टीरक्षकाच्या मागे उभा राहून हातात माईक घेऊन समालोचन करत होता.

अनेक क्रीडाप्रेमींनी नासिरच्या या समालोचनावर टिवटरच्या माध्यमातून आक्षेप नोंदवला आहे. क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्डवर काल वर्ल्ड रेस्ट इलेव्हन आणि विंडीज संघामध्ये प्रदर्शनीय सामना खेळवण्यात आला. या प्रदर्शनीय टी-20 सामन्याला आईसीसीने आंतरराष्ट्रीय सामन्याचा दर्जा दिला होता.

इरमा आणि मारिया या वादळांमुळे विंडीजच्या क्रिकेट मैदानांचे मोठे नुकसान झाले होते. त्या मैदानांच्या पुनर्बांधणीला लागणारा निधी उभारण्यासाठी हा सामना आयोजित केला आहे. या ऐतिहासिक सामन्यात विंडीजने 72 धावांनी वर्ल्ड रेस्ट इलेव्हन संघावर विजय मिळवला.

LEAVE A REPLY

*