बारावी निकालात यंदाही मुलींचेच वर्चस्व आठ महाविद्यालयांचा निकाल 90 टक्केपेक्षा जास्त

0
जळगाव । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज जाहीर झाला. यात जळगाव शहराचा निकाल 85.81 टक्के लागला असून जी.एच रायसोनी कनिष्ठ महाविद्यालय, सेंट टेरेसा व विवेकानंद प्रतिष्ठानचा 100 टक्के निकाल लागला आहे. यात मू.जे महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेतून नेहा राजेश कलंत्री या विद्यार्थीनीने 96.15 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे.

बारावीनंतर विद्यार्थ्यांच्या आयुष्यात टर्निंग पॉइंट येत असतो. त्यामुळे निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांसोबतच पालकवर्गाचीदेखील धाकधूक वाढली होती. दुपारी एक वाजता ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर शहरातील, सायबर कॅफेसह कॉलेज परिसरात विद्यार्थ्यांनी निकालासाठी गर्दी केली होती. यावेळी अनेक विद्यार्थी निकाल पाहिल्यानंतर आनंदोत्सव साजरा केला. तर काही विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळाल्याने मिठाई वाटून जल्लोष केला. बारावी परिक्षेसाठी जळगाव शहरातून 7 हजार 374 विद्यार्थी परिक्षेसाठी पात्र ठरले होते. त्यापैकी 6 हजार 332 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शहराचा निकाल 85.81 टक्के इतका लागला आहे.

शहरात मुलींच ठरल्या सरस
यंदाही 12 वीच्या निकालात मुलांना मागे टाकत मुलींनीच बाजी मारली आहे. शहरातून बारावीच्या परिक्षेसाठी 7 हजार 374 विद्यार्थी बसले होते. यात मुलांची टक्केवारी 83.21 तर मुलींची 89.62 इतकी असल्याने यंदा मुलींना आपले वर्चस्व सिध्द केले आहे. मागील वर्षी देखी मुलीच सरस ठरल्या होत्या.

नुतन मराठा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
नुतन मराठा महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा 94.95 टक्के, वाणिज्या शाखेचा 82.32 टक्के तर कला शाखेचा 53.65 टक्के निकाल लागला आहे. यात विज्ञान शाखेतून ऋृत्विक राजेश देशमुख या विद्यार्थ्यांने 88.61 गुण मिळवून प्रथम, वाणिज्य शाखेतून भावेश जैन याने 78.61 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक तर कला शाखेतून अनिशा सुकदेव दानवे या विद्याथींर्नीने 74.15 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्याचप्रमाणे व्यवसाय अभ्यासक्रमात आकाश महाजन 68.76, सुरज दालवाला 66, तर अक्षय घोडसे याने 61.8 गुण मिळविले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्यावतीने कौतुक करण्यात आले.

मिल्लत ज्यु कॉलेजच्या कला शाखेचा 80 टक्के निकाल
मिल्लत हायस्कुल अ‍ॅण्ड ज्युनियअर कॉलेजच्या कला शाखेचा 80 टक्के निकाल लागला असून यात शेख राहीलाबी रोशन या विद्यार्थींनीने 74.15 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे. तसेच शाह सबा कोसर शाबान शहा या विद्यार्थींनीने 71.84 टक्के मिळवून द्वितीय तर खान रक्षंदा रईस या विद्यार्थींनीने 70.76 टक्के मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे.

महाराणा प्रताप विद्यालयाच्या कला शाखेचा 65.29 टक्के
महाराणा प्रताप विद्यालयाच्या कला शाखेचा निकाल 65.29 टक्के लागला असून यात अंकिता नामदेव शेंडे 82.46 प्रथम, सपना गौतम सोनवणे 69.69 द्वितीय क्रमांक, शेख अबरार शेख मकबुल 68.31 टक्के तृतीय गुण मिळवून मिळविला आहे.

डॉ. बेंडाळे महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेचा 94.50 टक्के निकाल
डॉ. अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेचा 94.50 टक्के, विज्ञान शाखेचा 91.15 टक्के तर कला शाखेचा 70.14 टक्के निकाला लागला आहे. वाणिज्य शाखेतून दिव्या काबरा या विद्यार्थींनीने 89.54 टक्के गुण मिळवून प्रथम तर विभावरी मोराणकर या विद्यार्थींनीने 83.54 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला आहे. विज्ञान शाखेतून प्रगती अमोल सपके या विद्यार्थींनीने 80.15 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर कला शाखेतून पायल अशोक महाजन या विद्यार्थींनीने 82.76 टक्के मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे. तसेच व्यवसाय अभ्यासक्रमातून सेजल गोसावी 78.92 टक्के, पुजा पाटील 75.84 टक्के तर भाग्यश्री जोशी 79.54 टक्के गुण मिळवून या विद्यार्थींनी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहे. तसेच मेघा युवराज पाटील हिला वाणिज्य शाखेत 69.74 टक्के मिळाले.

का.ऊ. कोल्हे विद्यालयाच्या विज्ञान शाखेचा 92.50 टक्के निकाल
काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालय व ज्यु कॉलेज या उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बारावी परिक्षेत घवघवीत यश संपादीत केले आहे. यंदा विज्ञान शाखेचा 92.50 टक्के निकाल लागला असून यात वीणा प्रमोद अत्तरदे या विद्यार्थीनी 650 पैकी 504 गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे. तर कला शाखेचा 89.47 टक्के निकाल लागला असून सपना गोकूळ ढोले या विद्यार्थींनीने 650 पैकी 491 गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे.

सिद्धी विनायक विद्यालय ज्यु.कॉलेजचा 91.88 टक्के निकाल
सिद्धी विनायक फाऊंडेशन संचलित सिद्धी विनायक विद्यालय अ‍ॅण्ड ज्यु.कॉलेजचा 91.88 टक्के निकाल लागला असून यात विज्ञान शाखेचा 95.20 तर कला शाखेचा 88.07 टक्के निकाल लागला आहे. विज्ञान शाखेतुन स्नेहल तायडे 76.46 प्रथम, हेमानी बढे 76.15 द्वितीय, दर्शन चव्हाण 73.53 तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहे. तसेच कला शाखेतील नेहा शर्मा 72.15 प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.

नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालयातून सायली शुक्ला प्रथम
नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय व महाविद्यालयातून सायली वासुदेव शुक्ला या विद्यार्थींने 85.23 टक्के गुण मिळवून वाणिज्य शाखेसह महाविद्यालयातून प्रथम क्रमांक मिळविला आहे. महाविद्यालयाचा कला शाखेचा 66.41, वाणिज्य शाखाचा 98.83 तर विज्ञान शाखेचा 100 टक्के निमाल लागला आहे. कला शाखेतून प्रतिभा इंगळे 79.83 प्रथम, कांचन दत्तू सोनवणे 77.85 द्वितीय, निकीता कोळी 73.85 तृतीय क्रमांक, वाणिज्य शाखेतून सायली शुक्ला 85.23 प्रथम, योगेश्री पाटील 83.85 द्वितीय तर गौरी महाले 81.54 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. तसेच विज्ञान शाखेतून अव्रिना सैय्यद 76.77 प्रथम, प्रतिक्षा पाटील 75.69 द्वितीय तर ब्रम्हेचा ऐश्वर्या 69.28 तृतीय क्रमांकाने यशस्वी झाले आहे.

मू.जे महाविद्यालयाने उज्ज्वल व गौरवशाली यशाची परंपरा कायम राखली असून महाविद्यालयाचा 94.92 टक्के निकाल लागला आहे. यात विज्ञान शाखेचा 98.22, वाणिज्य शाखेचा 94.47, कला शाखेचा 70.33 तर व्यवसायिक अभ्यासक्रम या विषयाचा 67.44 टक्के इतका निकाल लागला आहे.वाणिज्य शाखेतून प्रथम नेहा कलंत्री 96.15, द्वितीय सिद्धेश येवले व क्षितीजा न्याती 94.31, तृतीय निशांत खंडेलवाल 94.15,कला शाखेतून- प्रथम सायली करे 87.84, द्वितीय आराध्या संतराज 86.21, तृतीय इश्वर वखरे व सैय्यद फरआज अली 82, विज्ञान शाखेमधून प्रथम जयेश पाटील 92.92, द्वितीय किरण घुमारे 92.77, तृतीय श्रेया पंडीत 92.61 तर व्यवसायिक अभ्यासक्रमातून प्रथम शंकर राठोड 83.23, द्वितीय गणेश अटनेर 78.46, तृतीय सागर लोहार 75.38 क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. तसेच विज्ञान शाखेतून व्यकंटेश आशिष मुंदडा याला 91.5 टक्के गुण मिळाले असून तो मुदंडा अ‍ॅडर्व्हटॉयझिंगचे संचालक आशिष मुंदडा यांचा चिरंजीव आहे.

LEAVE A REPLY

*