Type to search

जळगाव फिचर्स

5 ग्रामपंचायतींचे 12 सदस्य अपात्र

Share

जळगाव 

जिल्ह्यातील वरखेडी ता.पाचोरा, रामनगर ता.40गाव, पाडळसे ता.यावल, अडावद ता.चोपडा, नांदवेल ता.मुक्ताईनगर अशा विविध पाच ग्रामपंचायतीतील सदस्यांनी मागास प्रवर्ग, नामाप्र, राखीव अशा विविध गटांतून निवडून आले होते. या सदस्यांनी निवडून आल्यानंतर विहित वेळेत जात पडताळणी प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने तक्रारदारांनी केलेल्या तक्रारीनुसार आज सुनावणीअंती या 12 सदस्यांवर जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी अपात्रतेची कारवाई केली असल्याची माहिती जिल्हा विधी अधिकारी अ‍ॅड.हारूल देवरे यांनी दिली.

पाचोरा तालुक्यातील वरखेडी ग्रामपंचायतीची 2015 मध्ये निवडणुकीत राखीव गटातून जगदीश पंढरीनाथ चौधरी व सीमा धनराज पाटील हे निवडून आले होते. यांच्या जातपडताळणी प्रमाणपत्र सादर न करण्याविरूद्ध पीतांबर त्र्यंबक पाटील यांनी दि.20जानेवारी 2019रोजी तक्रार दाखल केली होती. रामनगर ता.चाळीसगाव ग्रामपंचायतीतून सन 2017 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत इतर मागास वर्गातून कविता माणिकलाल बेलदार या निवडून आल्या होत्या. त्यांच्याविरूद्ध दि.10सप्टेबर 2019रोजी योगेश संदिप खैरनार रामनगर यांनी तक्रार दाखल केली होती.

किशोर शांताराम कोळी हे सन 2017मधे राखीव गटातून झालेल्या सार्वत्रिक ग्रामपंचायत पाडळसे ता.यावल येथे निवडणूकीत निवडून आले होते. यांच्याविरूद्ध विष्णू भोमा भिल रा.पाडळसे यांनी दि.4सप्टेबर 2019 तक्रार दाखल केली होती.

अडावद ता.चोपडा ग्रामपंचायतीच्या सन2018मधे झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीत मंगला मुरलीधर सोनवणे, चंद्रभागा महादू बावीस्कर, आसाराम घोगर कोळी, आशाबाई सुरेश कोळी/माळी, फकीरा मांगो तडवी या सदस्यांनी जातपडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याची तक्रार दि.3आगस्ट 2019रोजी वासूदेव नारायण महाजन अडावद ता.चोपडा यांनी दाखल केली होती.

नांदवेल ता.मुक्ताईनगर येथील ग्रामपंचायतींतर्गत मागास प्रवर्गातून मनिषा संदिप पाटील व मुरलीधर त्र्यंबक पाटील यांनी सन 2017मधे झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीत निवडून आले होते.यांच्या विरूद्ध या सदस्यांनी जातपडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याची तक्रार दिपक बुधा वाघ नांदवेल ता.मुक्ताईनगर यांनी दि.18जूलै 2019रोजी दाखल केली होती.

या सर्व ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी निवडून आल्यानंतर सहा महिन्याच्या आत विहित वेळेत जातपडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याने आज दि.10फेब्रुवारी 2020रोजी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी ग्रामपंचायत सदस्य पदासाठी अपात्रतेची कारवाई केली आहे. अशी माहिती जिल्हा विधि अधीकारी अ‍ॅड.देवरे यांनी दिली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!