प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरवात

0
जळगाव । दि.19 । प्रतिनिधी-इयत्ता 10 वी 12 वीचे निकाल लागताच महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांसह पालकांची लगबग दिसून येत असून प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरवात झाली आहे.
तसेच अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांमध्ये माहितीपुस्तिका घेण्यासाठी गर्दी केली आहे. आपल्या पाल्यांला चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी पालकांचीही धावपळ सुरु आहे.
यंदा बारावीसह दहावीच्या निकालाचा टक्का देखील वाढला आहे. त्यामुळे प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना मोठी कसोटी पार करावी लागणार आहे.

विद्यार्थी संख्या अधिक व महाविद्यालयीन जागा मात्र कमी कशी स्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे. प्रवेश मिळवताना आपल्याला अडचणी निर्माण व्हायला नको, यासाठी विद्यार्थ्यांनी आतापासूनच महाविद्यालयात माहितीपुस्तिका घेण्यासाठी गर्दी केली आहे.

यंदा अनेक विद्यार्थ्यांनी नव्वदी गाठली असल्याने विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल हा तंत्रनिकेतन व विज्ञान शाखेला असल्याचे दिसून येत आहे.

दहावीचा निकाल जाहीर होऊन सहा दिवस झाले आहेत. अद्याप विद्यार्थ्यांना गुणपत्रक मिळालेले नाही, महाविद्यालयांमध्ये प्रवेशप्रक्रियेलाप देखील सुरवात झालेली नाही, तरीही चौकशी व प्रवेशपत्र घेण्यासाठी विद्यार्थ्यांची सकाळी महाविद्यालयांमध्ये गर्दी दिसून येत आहे.

प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रियेला अद्याप आठ दिवसांचा कालावधी असला, तरी कोणती कागदपत्रे लागणार आहेत, याबाबतची चौकशी करण्यासाठी विद्यार्थी महाविद्यालयांत येत आहेत.

आयटीआयच्या 904 जागांसाठी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेला सुरवात
दहावीच्या निकालानंतर पुढील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा आयटीआयकडे देखील कल असल्याचे दिसून येत आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत या वर्षासाठी असलेल्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरवात झाली आहे.

विविध 21 ट्रेडसाठी 904 जागा उपलब्ध आहे. मागील वर्षी शासकीय आयटीआयमधील सर्वच ट्रेडच्या जागा पूर्णपणे भरल्या होत्या.

यावर्षी विद्यार्थ्यांचा कल अधिक दिसून येत आहे. दरम्यान 24 रोजी गुणपत्रक मिळणार आहे. तरी देखील विद्यार्थी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी फॉर्म भरतांना दिसत आहे.

यंदा 1 वर्षाचे 8 ट्रेड असून यासाठी 309 तर दोन वर्षाच्या 13 टे्रडसाठी 595 जागा रिक्त आहे. त्यामुळे एकूण 21 टे्रडसाठी 904 जागा उपलब्ध आहे.

 

LEAVE A REPLY

*