रावेर मतदार संघातील जनतेसाठी दोन टँकर,रुग्णवाहिकेची दिवाळी भेट 

भुसावळ माजी नगराध्यक्ष अनिल चौधरींची घोषणा

0
रावेर | प्रतिनिधी  :  तालुक्यातील पाल अभयारण्यात दुर्गम भागात राहणाऱ्या तांडा,वाडा,पाडयावर आदिवासी बांधव सण उत्सवाच्या आनंदापासुन कोसो दुर राहातो. त्या आदिवासी बांधवाला दिवाळीचा आनंद लुटता यावा… त्यालाही पंचपक्वान जेवणाचा आस्वाद घेता यावा … लहान लहान मुलांना नविन कपडे व फटाक्यांची मौज मजा घेता यावी… दिवाळी फराळाची चव चाखता यावी .

हे सर्व करतांना त्यांचे चेहऱ्यावर हास्य उमटावे. आणि या आनंदात व त्याचे चेहऱ्यावरिल आनंदाला मी निमित्त व्हावे . यासाठी रावेर विधानसभा मतदार संघातील वाडा,पाडा,तांडा या भागात प्रत्यक्ष जावून आदिवासी सोबत राहून दिवाळी उत्सव ७ नोव्हेंबर पासुन आठवडा मोठ्या धामधूमीत शांततेत साजरा करणार असल्याचे भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी सांगीतले. जनतेच्या समस्यांची जाणीव करून घेत असताना ते सोडविण्यासाठी कायम झटणार आहे. हि विधानसभा निवडणूकीची तयारी असल्याच्या वृत्तास त्यांनी दुजोरा दिला .

महाराष्ट्र शासनाने रावेर , यावल तालुक्यात दुष्काळ घोषीत केला आहे.पाण्याची भुजल पातळी खालावून भविष्यात तीव्रपाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. येणाऱ्या पाणी टंचाईच्या संकटावर मात करण्यासाठी रावेर,यावल तालुक्यातील जनतेच्या सेवे करिता दोन टॅन्कर व रुग्णवाहिका दिवाळी निमित्त विधानसभा मतदार संघाला दिवाळी भेट देणार असल्याचे अनिल चौधरी यांनी सांगितले.हि विधानसभा निवडणुक लढण्याची तयारी आहे .जनतेच्या विश्वासास पात्र ठरण्याचा प्रयत्न करित आहे .जनता नक्कीच माझ्याच पाठिशी आहे व राहिल यात शंका नसल्याचे ही चौधरी बोलत होते .

रावेर विधानसभा मतदारसंघातील पालपरिसरातील गारवर्डी,अंधारमळी,गाडऱ्या, जामन्या,लंगडा अंबा,जिन्सी, अभोडा,पाल सह अतिदुर्गम भागातील जंगलात राहाणाऱ्या तांडा,पाडा,वाडा वस्त्यांवर जावून …कि ज्या ठिकाणी वाहने जाणे सुद्धा कठीण असतात अशा ठिकाणी पायदळ प्रवास करून आदिवासींच्या कुटुंब ,लहान मुलांसोबत दिवाळीच्या फटाक्यांचा,जेवणाचा,फराळाचा आनंद घेवून आदिवासींचा आनंद आठवडाभर राहून अनिल चौधरी द्विगुणित करणार आहे .

अनिल चौधरी सारख्या एखाद लोकप्रतिनिधीने आदिवासी सोबत आठवडाभर जंगलात राहून दिवाळी साजरा करण्याचा हा पहिलाच प्रसंग असल्याचे आदिवासी बांधव सांगतात . मागील वर्षी भाजपाचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी नातवाचा वाढदिवस व दिवाळी गाडऱ्या जामन्या येथे आदिवासी बांधवां सोबत मुक्कामाला राहून साजरी केली होती.

आदिवासींना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कायम प्रयत्न करणार आहे. त्यांच्या न्याय , हक्कासाठी झटणार असल्याचे अनिल चौधरी यांनी आदिवासीच्या प्रत्यक्ष भेटी प्रसंगी संवाद साधतांना सांगितले .

LEAVE A REPLY

*