पारोळ्यातून बेपत्ता मुलीचे शव सापडले विहिरीत

0
पारोळा | योगेश पाटील:  येथील महादू आप्पा नगरातील अठरा वर्षीय तरुणी कालपासून बाजारात बाजार करायला जाते असे सांगून गेली ती परत आली नाही म्हणून ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात दि.७ रोजी दिली होती मात्र त्या मुलीचे महादू आप्पा नगरमधील माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे यांच्या विहिरीत शव मिळून आले.

याबाबत बापू भिवा मरसाळे हे महादू आप्पा नगर येथे रहात असून त्यांच्याकडे रथोत्सव पाहण्यासाठी त्यांची मेव्हणी (साली)प्रतिभा नारायण खैरनार(१८) रा टाकळी ता चाळीसगाव ही आली होती ती काल सकाळी बाजारातून किराणा बाजार करून येते असे सांगून गेली असता ती उशिरापर्यंत घरी न आल्याने पारोळा पो स्टे ला बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती

पोलीस शोध घेत असताना बापू मरसाळे यांच्या घरासमोरील गोविंद शिरोळे यांच्या शेतातील विहिरीत प्रतिभाचा मृतदेह तरंगताना दिसून आला त्याठिकाणी पो नि विलास सोनवणे, हे कॉ बापूराव पाटील,विनोद साळी यांनी जाऊन शव बाहेर काडून पंचनामा केला शव कुटीर रुग्णालयात हलविण्यात आले

 

त्यावर डाँ योगेश साळुंखे व दीपक सोनार यांनी शवविच्छेदन करून नातेवाइकांच्या ताब्यात दिले.पारोळा पो स्टे ला नारायण झिपरु खैरनार रा टाकळी ता पाचोरा यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हे कॉ विनोद कोळी हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

*