आरक्षणासाठी आता मराठा संघटनांच्या नवा पक्ष : महाराष्ट्र क्रांती सेना

0
पुणे : मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत अनेक आदोलने केलीत. राज्यभरात मुक मोर्च काढलेत. परंतू शासनाने पूरती पाने पुसलीत. त्यामुळे आता मराठा सघंटनांनी महाराष्ट्र क्रांती सेना या नावाने नव्या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे.

मराठा समाजाचे नेते सुरेश पाटील यांनी पाडव्याच्या मुहूर्तावर रायरेश्वर येथे या नव्या पक्षाची स्थापना केली आहे. यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या ठिकाणी राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांचे बॅनर्स लावण्यात आलेले होते.

दरम्यान, नव्या पक्षाची मोर्चे बांधणी सुरू करण्यात आल्याचं सुरेश पाटील यांनी सांगितलं. तसेच उदयनराजे भोसले यांचा आमच्या पक्षाला संपूर्ण पाठिंबा असून आगामी लोकसभा निवडणुकीत उदयनराजे आमचे उमेदवार असू शकतात, असं पाटील यांनी सांगितलं. मराठा क्रांती मोर्चाच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याची उदयनराजेंना विनंती करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

LEAVE A REPLY

*