महामानवास अभिवादन

0
जळगाव । भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63 व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त शहरातील विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय संस्था, संघटनांतर्फे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊन महामानवास अभिवादन करण्यात आले.

आरपीआय (आठवले गट) महिला आघाडी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) महिला आघाडीच्या वतीने रामेश्वर कॉलनी भागातील महिला आघाडीच्या संपर्क कार्यालयात अभिवादन करण्यात आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस तालुका अध्यक्ष रमा ढिवरे, डॉ.अभिजीत पाटील यांनी पुष्पहार अर्पण केले. योगेश वाणी, महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सागर सपकाळे, मीराबाई सोनवणे, प्रमोद सोनार, भिमसिंग राठोड, पुरुषोत्तम सोनवणे, जनार्दन पंधारे, अरुणा पवार, गोधाबाई राठोड, किरण कोळी, ईश्वर चंद्रे, पिंटु सोनवणे, हर्षाली देवरे, लता वाघ उपस्थित होते.

शिरीष चौधरी महाविद्यालयात
धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाविद्यालात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्राचार्य डॉ.आर.बी.वाघुळदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या रेखा भोळे, रासेयो अधिकारी प्रा.अनिल सोनवणे, रासेयो सहाय्यक अधिकारी मिलिंद काळे, विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा.प्रियंका बर्‍हाटे उपस्थित होते.

काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालय
काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयात महापरिवनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. उपमुख्याध्यापक ए.व्ही.ठोसर, एच.एच.बोरोले यांनी विद्याथ्यार्र्ंना डॉ.आंबेडकर यांच्याविषयी माहिती सांगितली. सुत्रसंचलन व आभार यु.जे.पाटील यांनी केले. या स्पर्धेस मुख्याध्यापिका जे.आर.गोसावी, उपचिटणीस एस.डी.खडके, एच.जी.काळे, पी.ए.पाटील उपस्थित होते.

बहिणाबाई प्राथमिक विद्यालय
बहिणाबाई प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बंडूदादा काळे होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव जनार्दन रोटे यांनी निमंत्रीत करण्यात आले होते. व्यासपीठावर मुख्याध्यापक राम महाजन, टी.एस.चौधरी, प्रतिभा खडके उपस्थित होतते. सुत्रसंचलन आर.एस.वाणी यांनी केले. तर आभार सी.बी.पाटील यांनी मानले.

स्व.बी.एम.जैन प्राथमिक विद्यालय
दि. पूर्व खान्देश हिंदी शिक्षण संस्था संचलित प्रेमनगर येथील स्व.शेठ बी.एम.जैन प्राथमिक विद्यालय जळगाव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाणदिन साजरा करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रम अध्यक्षस्थानी शाळेतील इ.4 थीची विद्यार्थीनी विधी गौरव सुरवाडे उपस्थित होती. अध्यक्षांच्या हस्ते प्रतिमेस माल्यार्पण व पुष्पार्पण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन भारती सोनवणे यांनी केले.

आर.आर.विद्यालय
आर.आर.विद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचय महापरिनिर्वाणदिन कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक एस.बी.अत्तरदे होते. याप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षक बी.ए.पानपाटील, आर.एस.सोनवणे, पुष्पलता वानखेडे उपस्थित होते. सुत्रसंचलन रोशनी ढोले, द्वारकाधीश जोशी यांनी केले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने (आठवले गट) आदरांजली वाहण्यात आली. प्रतिमेस रिपाइंचे विभागीय अध्यक्ष दिपक सपकाळे, यशवंत घोडेस्वार, चळवळीचे ज्येष्ठ नेते आनंदा तायडे, गौतम सपकाळे यांनी माल्यार्पण करुन अविभादन केले. यावेळी राजु सपकाळे, नाना डशेंगरे, वासुदेव कुकरेजा, अशाके पारधे, दिपक तायडे, सिद्धार्थ तायडे, विकास तायडे, सुकदेव घ्याळींगे, युवराज नन्नवरे, शंकर गरुड, सचिन तायडे, रवी घ्याळींगे, आनंद सपकाळे, विनोद सोनवणे, सतिष तायडे, भारत ब्राह्मणे, बापू सोनवणे, भारत नन्नवरे, दिनेश सपकाळे, दिपक साहेबराव, किशोर नन्नवरे, दिनेश शेजवळ, आकाश आढंगे उपस्थित होते.

ज्ञानसाधना प्राथमिक विद्यामंदिर
व्यायाम शाळेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मृतीदिन संपन्न करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बंडूदादा काळे, सचिव ज.वा.रोटे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. व दिपप्रज्वलन केले. यावेळी शुभांगी वारके, राजेश तडवी उपस्थित होते.

रिपाइं खरात गट
रिपब्लिकन र्पाी ऑफ इंडिया (खरात गट) जिल्हा शाखेच्यावतीने रेल्वे स्टेशनजवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास जिल्हाध्यक्ष जे.डी.भालेराव, आण्णा अडकमोल, शरद धनगर, आर.के.सपकाळे, रवी जाधव, जावेद खाटीक, मिलिंद हिरोळे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी राजमल सपकाळे, चंद्रकांत अहिरे, अफजल पठाण, यशवंत भालेराव, रवी इंगोळे, सिद्धार्थ अहिरे, नरेंद्र सपकाळे, रिषभ सोनवणे, मोहन भालेराव, फिरोज शेख, राजेश सोनवणे, इरफान खान, भैय्या सपकाळे, जाकीर बागवान, महेंद्र खैरनार, फिरोज खाटीक, शब्बीर शाह, पप्पु भोई, छोटू परदेशी उपस्थित होते.

सम्यक प्रबोधन मंच
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना सम्यक प्रबोधन मंचातर्फे अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रा.यशवंतराव मोरे, वसंत सपकाळे, सजन भालेराव, बळवंत भालेराव, प्रा.सुहास बागुल, किशोर पगारे, संतोष गायकवाड, साहेबराव बागुल, डी.सी.इंगळे, राजू मोरे, जे.डी.भालेराव, राजेंद्र गडवे, मुरलीधर सपकाळे, श्रीकांत बाविस्कर, मुरलीधर डोले, ईश्वर वाघ, मधुकर सपकाळे, खंडू सपकाळे, रतन अडकमोल, शरद धनगर, जावेद खाटीक, आबा खैरनार, बी.जी.बोदडे, विश्वास बिर्‍हाडे, रवीकिरण बिर्‍हाडे, चंद्रदर्शन सुर्यवंशी, रविंद्र वानखेडे, उत्तम भालेरवा, रविंद्र इंदवे, यादवराव बाविस्कर उपस्थित होते.

ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय
के.सी.ई. संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालय व ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भुसावळचे शिक्षणविस्तार अधिकारी सुमित्र अहिरे, जळगावचे शिक्षण विस्तार अधिकारी रविकिरण बिर्‍हाडे, केंद्रप्रमुख शांताराम साळुंखे, के.जी. फेगडे यांच्याहस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.दामोदर चौधरी, गुणेश पाटील, आदित्य विसपुते, ईशा पाटील, तुषार पाटील, प्रगती मराठे, हेताक्षी बारी, सुजल चौधरी, प्रथमेश वाघ आदी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन उपशिक्षक योगेश भालेराव यांनी केले तर आभार उपशिक्षिका प्रणिता झांबरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी कल्पना तायडे, दिपाली चौधरी, माधुरी भंगाळे, प्रवीण महाजन, योगेश सुने, सुधीर वाणी आदींनी आदींनी परिश्रम घेतले. प्रसंगी मुख्याध्यापक दिलीपकुमार चौधरी, पर्यवेक्षिका उषा नेमाडे, सरला पाटील आदी उपस्थित होते.

मू.जे. महाविद्यालय
मु.जे. महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी आणि उपप्राचार्य डॉ.सुरेश तायडे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बुद्धवंदना घेण्यात आली. या कार्यक्रमाला डॉ.चंद्रमणी लभाने, प्रा.देवेंद्र इंगळे, प्रा.संजय हिंगोणेकर, प्रा.योगेश महाले, प्रा.के.के.वळवी, प्रा.जयेश पाडवी, डॉ.लक्ष्मण वाघ, प्रा.डी.आर.वसावे, डॉ.उज्ज्वला नेहते, प्रा.प्रिती शुक्ला, प्रा.गोपीचंद धनगर, प्रा.राजीव पवार, प्रा.सुप्रिया बोदडे, प्रा.आर.आर.अत्तरदे, प्रा.अमोल बावस्कर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन पीयूष तोडकर याने केले.

केसीई अध्यापक विद्यालय
के.सी.ई. सोसायटीचे अध्यापक विद्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. प्राचार्य डॉ. ए.आर. राणे यांच्या प्रतिमेस मार्ल्यापण करण्यात आले. यावेळी डी.डी.भाटेवाल, योगेश भालेराव उपस्थित होते. छात्रअध्यापक मनीष बागुल याने गीत सादर केले. सूत्रसंचालन एस.एस.तायडे यांनी केले तर आभार प्रा.किसन पावरा यांनी मानले. प्रा.एच.टी. चौधरी, प्रा.एस.व्ही.झोपे, प्रा.एस.एम.पाटील, डॉ.डी.एस.पवार, जयश्री तळेले उपस्थित होते. यशस्वीतेसाठी शरद सोनार तसेच प्रथम वर्षाच्या डी.एल.एड छात्राध्यापकांनी आणि वर्ग प्रतिनिधींनी परिश्रम घेतले.

बालनिकेतन विद्यामंदिर
बालनिकेतन विद्यामंदिर व नवीन माध्यमिक महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. डॉ.रविंद्र माळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुण्यतिथीनिमित्त शाळेतील इ.1ली ते 10 वीच्या विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा व प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत चांदणी सुर्यवंशी, सानिष्का सुर्यवंशी, सुरक्षा प्रधान, वैष्णवी सोनवणे, अक्षदा पूर्वीया आदी विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवला. भरत सोनार व समीर राठोड यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची वेशभूषा केली होती. सुत्रसंचलन उज्वला जाधव, संगीता निकम यांनी केले. यशस्वीतेसाठी नरेंद्र वारके, रशिदा तडवी, पल्लवी श्रावणे, वंदना धांडे, राहुल धनगर, श्रीकांत पाटील, निलेश नाईक, सुवर्णा सोनार, भूषण बर्‍हाटे आदींनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

*