Type to search

maharashtra जळगाव

विकासापासून वंचित असलेला प्रभाग

Share
जळगाव । प्रभाग क्र. 18 म्हणजे विविध समस्या तसेच अस्वच्छतेचे माहेरघर असून गलिच्छ व तुंबलेल्या गटारी, साफसफाई आदी समस्या मोठ्या प्रमाणावर असून दुर्गंधीयुक्त व विकासापासून वंचित असलेला हा प्रभाग आहे. नागरी सोयी सुविधांचा अभाव सर्वत्र दिसून आला.

परिसरात येणारा भाग
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागील भाग, अक्सा नगर, ममता हॉस्पिटल परिसर, संतोषी माता नगर, रजा कॉलनी, गणेशपुरी, काशीनाथ लॉजमागील परिसर, दत्तनगर, लक्ष्मीनगर, एमएसईबी कॉलनी, अपना कॉलनी, असा भाग हा या प्रभागात येतो. या प्रभागाचे नेतृत्व एमआयएमचे गटप्रमुख रियाज बागवान, सुन्नाबी राजु देशमुख, शेख सईदा युसुफ हे एमआयएमचे तर शिवसेनेचे इब्राहिम मुसा पटेल हे प्रतिनिधीत्व करीत आहेत.

या प्रभागात असलेल्या नाल्यावर कठडा नसल्याने कठड्यावर संरक्षण भिंत बांधणे आवश्यक आहे. परिसरात एलईडी अद्याप बसविण्यात आलेले नाही. खुला भूखंडांचा विकास होणे गरजेचे आहे.

परिसरात अनेक ठिकाणी गटारी, अस्वच्छतेची समस्या आहे. अनेकवेळा अंधाराचे साम्राज्य असते.गलिच्छ व तुंबलेल्या गटारी, छोटीछोटी दाटीवाटीने असलेली घरे, घरात पावसाचे पाणी जाते, साफसफाईकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. सर्वदूर अस्वच्छता दिसून येते. काही भागात झाडू मारणारे येतात तर काही भागात येतच नाहीत.

मूलभूत सुविधांसाठी 1.56 लाखांचा निधी मंजूर झालेला आहे. खुल्या व्यायाम शाळा, कुंपण भिंत तसेच नाल्यावर संरक्षक भिंत बांधण्यात येईल. कामांचा प्रस्ताव टाकलेला आहे. लक्ष्मीनगर, मेहरुण, खुला भूखंडावर विकास करणार आहोत. रत्यांची समस्या सोडवू
-सना बी देशमुख, नगरसेविका

ममता हॉस्पिटलपासून ते रामेश्वर कॉलनीपर्यंतच्या ऐरियात मूलभूत सुविधांचा अभाव मोठ्या प्रमाणावर आहे. सुविधा द्या, कर घ्या, असे नागरिकांचे म्हणणे आहे. आम्ही सकाळपासून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत असतो.
-शेख सईदा युसुफ, नगरसेविका

सत्ताधार्‍यांना कारभार करण्यात अपयश येत आहे. अंतर्गत राजकारणामुळे विकासाला खीळ बसली आहे. गाळेधारकांच्या प्रश्नी अपयश आले आहे. एलईडी लाईट बसवलेले नाहीत. तसेच सध्या काही ठिकाणी स्ट्रीट लाईट बंद आहेत. आरोग्य अधिकारी फिरकत नाहीत. फोन करावा लागतो.
-रियाज बागवान, नगरसेवक

अमृत योजनेच्या कामांमुळे रस्ते खोदून ठेवलेले आहे. पाईपलाईन टाकल्यानंतर रस्त्यांची दबाई व्यवस्थित झालेली नाही. यामुळे रस्त्यावर खड्डे तसेच मुरुम पडलेला असतो. साफसफाई करणारे नियमित दिसत नाहीत. घंटागाड्या व सफाई कर्मचारी केवळ नावालाच आहेत.
-इब्राहिम पटेल, नगरसेवक

मोकाट कुत्र्यांचा हैदोस
शेरा मुलतानी चौकात मोठ्या प्रमाणावर उकीरडा आहे. येथे घाण, कचरा जमा होतो, उरलेले अन्नही तेथेच टाकतात, मनपावाले आठवड्यानंतर कुंडी साफ करायला येत होते आता तीन चार दिवसात येतात मात्र कचरा पूर्ण साफ होत नाही, रमजान असल्याने सफाई व्हावी.
-अक्रम देशमुख

गटारीचे पाणी रस्त्यावर
गटारमध्ये घाण अडकते त्यामुळे गटारीचे पाणी रस्त्यावर येते, ती साफसफाई होत नाही, अमृत योजनेची कामे परिसरात झाली आहेत. मात्र पाईप बुजल्यानंतर रस्ता साफ केलेला नाही, झाडू मारणारे दिसत नाहीत, नियमित साफसफाई नाही. रमजान असल्याने सफाई व्हावी.
-असलम बागवान

कचरा अडकून राहतो
रजा चौकात केरकचरा उचलण्यासाठी गाडी फिरकत नाही, झाडू मारणारे नियमित यायला पाहिजे. उमर मस्जिद चौक गल्लीत गटारी चोकअप झालेल्या आहेत. केरकचरा अटकून राहतो, गटारी खोल आहेत, या गटारीमध्ये लहान मुले खेळतांना पडतात, घाण दूर करावी.
-नदीम मण्यार

कचरा गाडी येत नाही
संतोषी माता मंदिरालगत असलेली गल्लीत तर पुढे असलेला उमर मस्जिद चौक गल्लीत गटारी चोकअप झालेल्या आहेत. रजा चौकात साफसफाईवाले येत नाही, केरकचरा उचलण्यासाठी गाडी फिरकत नाही, झाडू मारणारे नियमित वा एकदोन दिवसाआड तरी यायला पाहिजे.
-इरफान शेख

पुरेसे पाणी पुरवावे
रमजान सण येत असल्याने पाणी पुरेशा प्रमाणात द्यावे 6 दिवसात पाणी 45 मिनिटे येते, ते पुरेसे होत नाही, रस्त्यांची दुरावस्था आहे, रस्त्याची घाण आमच्या घरात उडते, गटारीतील कचरा साफसफाई व्हावा, तसेच या भागात नाल्यावर कठडे लावल्यास बरे होईल.
-युसुफभाई खाटीक
कुंडी साफ होत नाही
परिसरात झाडू मारणारे व्यवस्थित साफसफाई करत नाहीत, समोरचा कचर्‍याचा ढीग उचलायला गाडी येत नाही, समोरच उघडी डीपी आहे ती घातक आहे. रमजान महिना असल्याने सफाई कडे मनपा सफाई कामगारांनी लक्ष ठेवावी व सफाई ठेवावी, पाणी मुबलक द्यावे.
-शकील खान

कचर्‍याचा त्रास
दुकानांसमोर असलेल्या कचरा कुंडीवर कचरा जमा होतो, कृउबाच्या मागील रस्त्यावर दोन्ही कडेला गटारी आहेत. गटारींमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा अडकून राहतो, साफसफाई होत नाही, मोकाट कुत्रे वावरतात, कुत्रे दुकानातही घुसतात, दुकानदारांना त्रास आहे.
-शेख इलियास

डीपीतून उडतात चिणग्या
झाडू मारणारे येतात मात्र गप्पा मारत बसतात, संतोषी माता मंदिराजवळ डीपी उघडीच राहते, तेथे वारंवार चिणग्या उडतात,मात्र एमएसईबीवाले दखल घेत नाही, मनपावालेही फिरकत नाहीत, निवडणुकीपुते या परिसरात येतात. निवडणुका झाल्या की कुणीही येत नाही,
-जावेद अली

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!