Type to search

जळगाव

शिवाजीनगरात गढूळ पाणीपुरवठा

Share

जळगाव । शिवाजीनगरातील प्रभाग 2 मध्ये सकाळी 10.30 च्या दरम्यान गढूळ व दूषित पाणी पुरवठा झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. जवळपास अर्धा तास चाललेल्या या गढूळ पाण्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेल्याची माहिती नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी दिली.

ठरल्याप्रमाणे मंगळवार सकाळी 10.30 वा. शिवाजीनगर प्रभाग 2 मध्ये पाणी पुरवठा करण्यात आला. मात्र पाणीपुरवठा गढूळ होत असल्याचे काही नागरिकांनी नगरसेवक दारकुंडे यांना सांगितले असता श्री. दारकुंडे यांनी तात्काळ उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांना ही बाब कळविली.

पाणीपुरवठा थांबविण्याचे आदेश
या दोघांनी संबंधित पाणी पुरवठा अभियंत्यास तात्काळ होत असलेला पाणीपुरवठा थांबविण्याचे आदेश दिले. काही वेळात हा पाणीपुरवठा थांबविण्यात आला. मात्र तोपर्यंत हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली होती. कारण गढूळ पाणी पुरवठा असल्याने नागरिकांनी असे पाणी भरले नाही. परिणामी हे पाणी वाया गेले. नंतर चांगला पाणी पुरवठा झाल्याने नागरिकांनी पाणी भरले.

गढूळ पाणीपुरवठा का झाला याबाबत सखोल माहिती घेतली असता चौथ्या टाकीवरचा व्हॉल्व्ह मनपा कर्मचार्‍याने सोडल्याने हा गढुळ पाणीपुरवठा झाला असल्याचे समजले. दरम्यान मनपा कर्मचार्‍याच्या दुर्लक्षामुळे अनावधानाने चौथ्या टाकीवरुन पाणी पुरवठा सोडला गेल्याचे अभियंत्यांनी सांगितले.

पाण्याची नासाडी
हजारो पाण्याची नासाडी झाल्याने याबाबत एकच चर्चा या प्रभागात होत होती. एकतर उन्हाळ्याचे दिवस, त्यात नागरिकांना तीन दिवसाआड पाणी पुरवठा होतो. काही प्रभागात तर 5 ते 6 दिवसाआड पाणी पुरवठा होत असतो. अशी परिस्थिती असतांना शिवाजीनगरात मात्र आज हजारो लिटर पाणी वाया गेले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!