एकाच प्रकारात दुहेरी मुकुट ; मनजीतची ‘सुवर्ण’झेप तर जिन्सनला रौप्यपदक

0

जकार्ता : मंगळवारी १८ व्या आशियाई स्पर्धेमध्ये ८०० मीटर शर्यतीत भारताचा धावपटू मनजीत सिंगने सुवर्णपदक पटकावले आहे. मनजीतने ८०० मीटर अंतर १ मिनिट ४६.१५ सेकंदात पूर्ण करत ही सुवर्ण झेप घेतली. या सुवर्णपदकासह भारताच्या खात्यात एकूण नऊ सुवर्णपदकांची नोंद झाली आहे.

याच स्पर्धेत भारताच्या जिन्सन जॉन्सनेही रौप्य पदक पटकावले. त्यामुळे एकाच शर्यतीत भारताला दोन पदके मिळाली. जिन्सनने १ मिनिट ४६.३५ सेकंदात ही शर्यत पूर्ण केली. या दोन्ही धावपटूंनी भारतीय अॅथलिटिक्समध्ये नवा इतिहास घडवला आहे. १९६२ नंतर प्रथमच अॅथलिटिक्स या क्रीडा प्रकारात भारताला एकाच वेळी सुवर्ण आणि रौप्यपदक पटकावण्यात यश आले आहे.

LEAVE A REPLY

*