जैन समाजातील तरूणांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावे

0
तारकपूर परिसरातील व्यापार्‍यास मारहाण प्रकरणी चूकीच्या पध्दतीने गोवलेल्या तरूणांवरील गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणी जैन समाजाच्यावतीने एसपी रंजनकुमार शर्मा यांना निवेदनातून करण्यात आली. यावेळी सुरेश मेहेल, मेहुल भंडारी, पोपटशेठ लोढा, माजी नगरसेवक संजय चोपडा यांच्यासह शहरातील जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगर टाइम्स,

जैन समाजाच्या वतीने एसपी रंजनकुमार शर्मा यांना निवेदन

अहमदनगर (प्रतिनिधी)- तारकपूर परिसरातील व्यापार्‍या मारहाण प्रकरणा चूकीच्या पध्दतीने गोवलेल्या तरूणांवरील गुन्हे मागे घ्यावे, अशी जैन समाजाच्या वतीने एसपी रंजनकुमार शर्मा यांना निवेदनातून करण्यात आली. यावेळी सुरेश मेहेल, मेहुल भंडारी, पोपटशेठ लोढा, माजी नगरसेवक संजय चोपडा यांच्यासह शहरातील जैन समाज बांधव मोठ्या संख्याने उपस्थित होते. जैन समाजातील सर्व लोक हे व्यवसायिक आहे, समाजातील ऋषभ नेहुल भंडारी, अक्षय शिंगी, शुभम मेहेर, यांनी तारकपूर परिसरातील जगदीश हुंदराजमल पटलाई यांने मारहाण केल्याची तक्रार दिली आहे. ही तिनही युवकांचा या मारहाणीशी कोणताही संबंध नाही. तसेच मारहाणीच्या वेळी हे युवक वेगवेगळ्या ठिकाणी आहे. त्यांचे सीसीटिव्ही फुटेज देखील उपलब्ध आहे. दरम्यान या घटनेला काही लोक जातीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहे. सदर घटनेची तातडीने चौकशी करून निर्दोष तरूणांचा बळी देण्याचा प्रयत्न काही जणांकडून सुरू आहे. त्यामुळे या घटनेतील तिन्ही युवकांची नावे वगळावी अशी मागणी एसपीना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

 

LEAVE A REPLY

*