जैन मुनि तरूण सागरजी यांचे पहाटे महानिर्वाण

0

नवी दिल्ली, ता.1। क्रांतिकारी संत म्हणून ओळखले जाणारे जैन मुनि श्री 108 तरुण सागरजी यांचे आज पहाटे 3.18 वा. महानिर्वाण झाले.

अल्पशा आजारपणानंतर त्यांनी अन्न पाणी त्याग करून संथारा व्रत घेतले होते. आज दुपारी त्यांच्या पार्थिवावर दिल्ली मेरठ हायवे वरील तरुण सागरम तीर्थ येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

मुनिश्री  अरुणसागरजी ससंघ, आचार्यश्री, सौभाग्यसागरजी, उपाध्याय गुप्तिसागरजी, मुनिश्री अनुमानसागरजी, मुनिश्री शिवानंदसागरजी ससंघ यांच्या सान्निध्यात त्यांनी समाधी घेतल्याचे आश्रमाचे वतीने कळविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*