Type to search

बहुजन क्रांती मोर्चाचे नाशिकमध्ये जेलभरो; ३०-४० कार्यकर्ते ताब्यात

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

बहुजन क्रांती मोर्चाचे नाशिकमध्ये जेलभरो; ३०-४० कार्यकर्ते ताब्यात

Share

नाशिक | प्रतिनिधी

२०१४ च्या निवडणुकीपासून नियमित इव्हीएम मशीनवर अनेक संशय घेतले जात आहेत. तज्ञांनीदेखील हे मान्य केलेले असताना सरकारच्या विरोधात बहुजन क्रांती मोर्चाकडून देशातील प्रत्येक जिल्हात जेलभरो आंदोलन करण्यात येत आहे.

आज दुपारी बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने अशोक स्तंभ परिसरात जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रसंगावधान राखत सरकारवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ३०-४० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. याप्रसंगी कार्यकर्त्यांनी एव्हीएम हटवा देश वाचवा अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.

यावेळी सुजाता चौंधडे, प्रतीक्षा चव्हाण, सागर साळवे , डॉ विलास दानी , अक्षय अहिरे, राजेंद्र गायकवाड, पवन साळवे,  सागर पवार,  अमरे दोंदे, संजय वाघ सुमारे ३०-४० आंदोलकांना ताब्यात घेतले. सरकारवाड्याचे पोलिसांनी घटनास्थळी अनुचित प्रकार टाळण्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!