Type to search

maharashtra जळगाव

मतमोजणीची तयारी प्रक्रिया अंतिम टप्प्यात; प्रशासन सज्ज

Share
जळगाव । जिल्हयातील जळगाव व रावेर लोकसभा सर्वात्रिक निवडणुकीत झालेल्या मतदानाची 23 मे रोजी मोजणी होणार असून, मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी मतमोजणी केंद्राला भेट देवून पाहणी केली असल्याचे निवडणूक उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांनी सांगीतले.

गुरुवार दि. 23 रोजी सकाळी निवडणूक निर्णय अधिकारी, उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत मतदान यंत्रे ठेवलेल्या स्ट्राँगरूमचे सील उघडण्यात येईल. सहा वाजता रिर्पोटिंग त्यानंतर आठ वाजेच्या सुमारास प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सर्वप्रथम टपाली मतमोजणीसोबतच ईटीपीबीएसद्वारे प्राप्त सैन्यदलातील मतदारांच्या मतपत्रिकांची मोजणी बारकोड स्कॅनिंग केल्यानंतर सुरू करण्यात येईल.त्यानंतर मतदान यंत्रांमधील मतमोजणीला सुरुवात होणार असून, ईव्हीएमनंतर रॅन्डमली प्रत्येकी 5 व्हीव्हीपॅट मतदानाच्या चिठ्ठयांची मोजणी होणार असून, सर्व मतमोजणी प्रक्रियेचे चित्रीकरणही केले जाणार असल्याचे सांगीतले.

जळगावातून सर्विस कर्मचारी 9917 तर 6048 इटीपीबीएस मतपत्रिका तसेच रावेरमधून 9202 आणि 2402 सर्वीस व्होटर स्लीप पाठवण्यात आल्या होत्या. त्यापैकी 3948 जळगाव आणि 2988 इटीपीबीएससह रावेरमधून अनुक्रमे 2404 व 1404 असे मतपत्रिका प्राप्त झाल्या आहेत. जळगाव, रावेर लोकसभा मतदारसंघासाठी 14 टेबलवर प्रत्येकी 3 तसेच मायक्रो ऑब्झर्व्हर असे 60 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या फेरीतील मतमोजणीची आकडेवारी संकलित करण्यात येणार आहे,असे हुलवळे यांनी सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!