Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव मुख्य बातम्या

निलभ रोहन जळगावचे नवे डिवायएसपी

Share
जळगाव । जळगाव शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांची लातूर येथे बदली झाल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या जागी इचलकरंजी येथील डिवायएसपी निलभ रोहन यांची जळगाव डिवायएसपी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांची लातूर येथे बदली झाली होती. दरम्यान गृह विभागाने 6 निशस्त्र संवर्गातील उपअधिक्षक आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संवर्गातील अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश काढले. त्यात कोल्हापूर येथील इचलकरंजी उपविभागाचे अधिकारी निलभ रोहन यांची जळगाव शहर उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान रोहन लवकरच पदभार स्विकारणार असल्याचे समजते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!