Type to search

maharashtra जळगाव

मोहन नगरामध्ये अंगणात उभी असलेली मोटारसायकल लंपास

Share
जळगाव । शहरातील मोहन नगरमध्ये घराच्या अंगणात उभी असलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी दि.15 च्या मध्यरात्री लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी शुक्रवारी रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहननगरातील रहिवाशी गणेश जगताप यांचे सलुन दुकान असून दि.15 रोजी रात्री त्यांनी दुकान बंद करून घरी आल्यानंतर त्यांची एमएच 19 बीपी 0253 क्रमांकाची मोटारसायकल घराच्या अंगणात उभी केली. मध्यरात्री चोरट्याने ही मोटारसायकल लांबवून नेली. दि.16 च्या सकाळी त्यांच्या पत्नी अनिता यांना घराबाहेर उभी असलेली मोटारसायकल दिसून न आल्याने त्यांना मोटारसायकल चोरी झाल्याचे समजून आले. याबाबत गणेश जगताप यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीसात हरविल्याची नोंद करण्यात आली असून तपास पोहेकॉ अनिल फेगडे करीत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!