Type to search

ग.स.अध्यक्षपदी मनोज पाटील, उपाध्यक्षपदी शामकांत भदाणे

maharashtra जळगाव

ग.स.अध्यक्षपदी मनोज पाटील, उपाध्यक्षपदी शामकांत भदाणे

Share
जळगाव । बहुचर्चित ग.स.सोसायटीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात बुधवार दि. 15 रोजी 12 वाजता निवडप्रक्रिया सुरु झाली. अध्यक्षपदी मनोज पाटील तर उपाध्यक्षपदी शामकांत भदाणे यांनी विजयश्री खेचुन आणली. शिक्षक गटाचे ग.स. सोसायटीवर वर्चस्व कायम ठेवले.

ग.स.सोसायटीच्या अध्यक्षपदासाठी मनोज आत्माराम पाटील यांनी दोन अर्ज तर उदय पाटील यांनी एक अर्ज दाखल केला होता. उपाध्यक्षपदासाठी शामकांत भदाणे यांनी दोन अर्ज तर ज्ञानेश्वर सोनवणे यांनी एक अर्ज दाखल केला होता.

मनोज पाटील यांना एका अर्जावर सूचक विलास नेरकर, अनुमोदक तुकाराम बोरोले, तर दुसर्‍या अर्जावर सूचक सुभाष जाधव तर अनुमोदक सुनील अमृत पाटील यांनी पाठिंबा दिला. उपाध्यक्षपदासाठी शामकांत भदाणे यांना सूचक म्हणून सुनील निंबा पाटील तर अनुमोदक म्हणून विश्वासराव सूर्यवंशी यांनी स्वाक्षरी केली. 21 संचालकांनी मतदानाचा हक्क बजावला. अध्यक्षपदासाठी मनोज पाटील यांना 11 मते मिळवून प्रतिस्पर्धी उदय पाटील यांना 10 मते मिळाल्याने त्यांचा पराभव झाला. उपाध्यक्षपदासाठी शामकांत भदाणे यांनी 12 मते मिळवून विजयी तर ज्ञानेश्वर सोनवणे यांना 9 मते मिळाल्याने ते पराभूत झाले. निवडणूक निर्णय अधिकारी के.पी.पाटील यांनी काम पाहिले. नवनिर्वार्चित अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतर फटाक्यांची आतषबाजी करीत विजयाचा जल्लोष करण्यात आला. मनोज पाटील व शामकांत भदाणे यांचा सत्कार करण्यासाठी संचालकांची गर्दी झाली होती.

दरम्यान नाट्यमय घडामोडी झाल्यानंतर संचालकांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!