Wednesday, April 24, 2024
Homeजळगावराजकारणाची भट्टी जमविण्यासाठी कलावंत प्रयत्न करतात

राजकारणाची भट्टी जमविण्यासाठी कलावंत प्रयत्न करतात

जळगाव  – 

राजकारण म्हणजे कोळशाची खाण आहे. दरपाच वर्षांनी भट्टी लावायची आणि त्या भट्टीतून विविध पात्र करीत यशस्वी होण्याची भूमिका साकारली जाते. त्याचप्रमाणे कलेक्षेत्रात प्रामाणिकपणा ठेवून काम करावे लागते. तसेच गंध आणि प्रकाश यांच्या एकत्रीकरणातून अभिनेता घडतो. जळगावमध्येही नवे नट निर्माण होऊन त्यांच्या सिनेमांना नॅशनल अ‍ॅवार्ड मिळेल, असा आशावाद अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष व ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल जब्बार पटेल यांनी व्यक्त केला. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी अध्यक्षीय भाषण केले.

- Advertisement -

लेवा एज्युकेशन युनियन संस्थेच्या शताब्दी महोत्सवाच्या समारोपानिमित्त प्रमुख वक्ते म्हणून पटेल यांचे संस्थेच्या प्रांगणात  सायंकाळी 5 वाजता व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी माजी मंत्री एकनाथराव खडसे होते. मंचावर जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, संघपती दलीचंद जैन, संस्थाध्यक्ष डॉ. सुभाष चौधरी, उपाध्यक्ष अरुण नारखेडे, सचिव एन.एस.पाटील, सहसचिव डॉ.डी.के.टोके, संचालक किरण बेंडाळे, व.पु.होले, डॉ.अरुणाताई पाटील, आर.डी.वायकोळे,प्रा.एल.व्ही.बोरोले, प्राचार्य डॉ. एस.एस.राणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

‘भाऊ’वर  सिनेमा काढणार 

भवरलालभाऊंचे पहिले गुरु महात्मा गांधी, दुसरे गुरु पंडित नेहरु आणि तिसरे गुरु उद्योगक्षेत्रातील श्री.टाटा आहेत. भाऊ परदेशात गेले असते मोठ्या पदावर काम केले असते. मात्र, ज्या मातीत वाढलो. त्या मातीत कारखाने वाढले पाहिजे, असे भवरलालभाऊंना वाटायचे. स्वातंत्र्याचा खरा अर्थ लिहा, बोला असाच आहे. इतिहासात तुमची नोंद होईल. तसेच विद्यार्थ्यांनी चित्रपट सृष्टीत करिअर करून नावलौकिक मिळवावा. देशातील शेतकर्‍यांचा गंध ओळखणारा माणूस म्हणजे भवरलाल जैन होय. त्यांच्यावर लवकरच ‘भाऊ’ हा सिनेमा काढणार आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल जब्बार पटेल यांनी केले.

गंध अन् प्रकाशाच्या एकत्रीकरणातून घडतो अभिनेता 

दिग्दर्शक जब्बार पटेल यांची रंगकर्मी शंभू पाटील यांनी प्रकट मुलाखत घेतली. यात जब्बार पटेल यांनी सांगितले की, मी उभा आहे ज्या नाटकात प्रथम काम केले. वयाच्या 8 व्या वर्षी चेहर्‍याला रंग लावला. गंध आणि प्रकाश यांच्या एकत्रीकरणातून अभिनेता घडतो. पु.ल.देशपांडे आणि आचार्य अत्रे यांचा सहवास लाभला.

- Advertisment -

ताज्या बातम्या