Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

नगरच्या आयटी पार्कमध्ये आरएफआयडी कार्डची निर्मिती

Share

अहमदनगर (प्रतिनिधी) – युनिव्हर्सल सेंच्युरिटी सिस्टीम आणि के. एस. आयटी सोल्यूशन प्रायव्हेट लिमीटेड या कंपनींच्या माध्यमातून आरएफआयडी कोडींगच्या विविध प्रकारची कार्ड निर्मिती आजपासून नगरमध्ये सुरू करण्यात आल्याची माहिती कंपनीचे संचालक नरेंद्र बंडारू यांनी दिली.

कंपनीच्या कामाबाबत माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, ज्या ज्या ठिकाणी बारकोड, न्युआर कोड वापरला जातो त्या त्या ठिकाणी आरएफआयडी कोड वापरता येवू शकतो. तसेच शाळेत जाणार्‍या मुलांसाठी, कंपन्यांसाठी आणि अन्यत्र सुद्धा आरएफआयडी कोड वापरता येवू शकेल. अशा प्रकारची सुविधा देणारी ही देशातील पहिलीच कंपनी आहे. या कार्डमध्ये वापरल्या जाणार्‍या चिप मात्र चीनमधून मागविल्या जातात. त्यानंतर ग्राहकांच्या पसंतीनुसार आकर्षक रीस्टबँड, किचैन अथवा विविध प्रकारात या चीप बसवून दिल्या जातात.

एका तासात साडेचार हजार आरएफआडी कार्डस बनविण्याची क्षमता कंपनीची येथे आहे. त्यासाठी 200 कुशल कामगारांची गरज असून तशी भरतीही कंपनीने सुरू केली आहे. दोन सत्रामध्ये कंपनीचे काम चालणार असून एका सत्रात एकावेळी 20 कर्मचारी काम करणार आहेत. सध्या दिवसभरात 40 कर्मचारी येथे काम करत आहेत.
आंध्रप्रदेश, तेलंगणा राज्यात ही कंपनी 12 वर्षापासून सुविधा देत असून त्यांनी आता या कार्डचे नगरमध्ये उत्पादन सुरू केले आहे. यावेळी नरेंद्र बंडारू, राजेश आठरे, शुभम गांधी, गौरव शेटे आदी उपस्थित होते.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!