Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

नगरच्या आयटी पार्कमध्ये सोमवारपासून प्रशिक्षण

Share

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगरच्या एमआयडीसीतील आयटीपार्कमध्ये नोकर भरतीसाठी दोन कंपन्यांकडून युवक-युवतींच्या मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखतीमध्ये निवड झालेल्यांना मंगळवारी (दि.13) दुपारी आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते नोकरीसाठीची नियुक्तीपत्रे देण्यात आली. निवडलेल्या उमेदवारांना येत्या 19 ऑगस्टपासून प्रशिक्षण दिले जाणार आहे. या महिना अखेरीस आयटी पार्कचे उद्घाटन केले जाणार असल्याची माहिती आमदार जगताप यांनी दिली.

पहिल्या टप्प्यात 250 ते 300 युवक-युवतींना रोजगार उपलब्ध होणार आहे तर डिसेंबरपर्यंत सुमारे 1000 पेक्षा जास्त युवक-युवती आयटी पार्कमध्ये कार्यरत होणार आहेत. पहिल्या टप्प्यातील मुलाखतीसाठी दि.2 ते 4 ऑगस्ट या कालावधीत घेण्यात आल्या. त्यावेळी सुमारे 3 हजार युवक-युवतींनी उपस्थिती दर्शविली होती. पहिल्या टप्प्यासाठी ज्यांची निवड होऊ शकली नाही त्यांनी निराश न होता. पुढील टप्प्यात अधिक तयारी करून मुलाखत द्यावी असे आवाहन आ. जगताप यांनी केले.

एमआयडीसीत गेल्या 19 वर्षांपासून धूळखात पडलेल्या आयटीपार्क इमारतीचे आ. संग्राम जगताप यांनी पुढाकार घेऊन रुप पालटले आहे. याठिकाणी सात ते आठ आयटी कंपन्या लवकरच कार्यरत होणार आहेत. त्यातील दोन कंपन्यांनी नोकर भरतीसाठी मुलाखती घेऊन निवड झालेल्या युवक-युवतींना विविध पदांवर नियुक्त्या दिल्या आहेत. यामध्ये 12वी पासून ते पदवीधरपर्यंत तसेच पदव्युत्तर पदवी धारकांचा समावेश आहे.

स्वप्न प्रत्यक्षात साकार होणार
आमदार संग्राम जगताप म्हणाले, गेल्या पाच वर्षात शहरात विकासकामे करण्याबरोबरच तरुणांना शिक्षणानंतर रोजगार उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केले गेले. शहरात आयटी पार्क सुरू होण्यासाठी सातत्याने विविध कंपन्यांशी संपर्क सुरू होता, त्यास आत यश आले आहे. पहिल्या टप्प्यात 250 ते 300 तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून डिसेंबरपर्यंत ही संख्या 1000 वर जाईल आणि येत्या पाच वर्षात नगर शहर इतर महानगरांप्रमाणे आयटी हब म्हणून ओळखले जाईल. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आय टी पार्कचे स्वप्न महिना अखेरीस प्रत्यक्षात साकार होईल.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!