गणेशोत्सवात हे कराच…

0
गणेशोत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी केली. भारतीय समाजामध्ये एकी असावी हा यामागचा उद्देश होता. गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप आणले.
या उत्सवाने ब्रिटिश-विरोधी मतप्रचारासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे आणि दुसरे म्हणजे समाज जवळ येऊन त्यांच्यातील एकोपा वाढीस लागावा.

इंग्रजांच्या काळात भारतीय संस्कृती लयास जात होती, तसेच लोक एकत्र येत नव्हते. लोकमान्य टिळकांना वाटे की स्वातंत्र्यासाठी लोकांनी एकत्र यायला हवेच त्यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेश उत्सव सुरु केला आणि त्यातुन प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला.

परंतु आज गणेश उत्सवाला वेगळेच रूप आलेले आपल्या  लक्ष्यात येते. आज अनेक राजकीय नेते गणेशउत्सव या सण-उत्सवाकडे मतं गोळा करण्याची संधी म्हणून पाहत असतात. गणेशोत्सवाला सुरुवात झाली की लगेच नेत्यांचे त्या निमित्ताने स्वागत सभारंभ सुरु होतात.

गणेश उत्सवात काय करावे 
– व्यसने न पिण्याची प्रतिज्ञा करावी.
– मूर्ती, मंडप, भाविकांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळावी.
– मंडळांनी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवावे.
– मंडळांनी स्वागत कमानी उभारू नये

गणेश उत्सवात विशेषतः हे टाळावे ?
गणेशोत्सवात राजकीय नेत्यांचे स्वागत सभारंभ अजिबात ठेऊं नये.
गणेशोत्सव काळात दारू पिऊन धिंगाणा घातला जातो,  हे टाळले पाहिजे.
अनेक ठिकाणी   गणेशोत्सवात राजकीय नेत्यांचे स्वागत सभारंभ चालतात. चांगले दोन -तीन तास नेत्यांना मंडळात हार शाल देण्यात जातात तर धार्मिक विधीकरिता फारच कमी वेळ देण्यात येतो.

त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना असे वाटते की, वोट बँकेसाठी नेतेमंडळींच्या मानापानाच्या या ‘प्रथा-परंपरा‘ असतील तर त्या मोडायलाच हव्यात.
– प्रा योगेश अशोकराव हांडगे

LEAVE A REPLY

*