Type to search

Featured देश विदेश मुख्य बातम्या

इस्रोने दिली ऑर्बिटरच्या प्रकृतीची माहिती

Share

नवी दिल्ली- इस्रोने आज (गुरूवारी) ऑर्बिटरच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. ऑर्बिटरच्या पेलोडवर करण्यात आलेले प्रारंभिक प्रयोग यशस्वी ठरले आहेत. सर्व पेलोडसची कामगिरी समाधानकारक आहे असे इस्रोने ट्विटमध्ये म्हटले आहे.

ऑर्बिटरचा लँडरशी संपर्क तुटला असला तरी चंद्राच्या कक्षेत फिरत असलेला ऑर्बिटर निर्णायक ठरेल असा विश्‍वास काही दिवसांपूर्वी इस्रोचे प्रमुख सिवन यांनी व्यक्त केला होता. ऑर्बिटरचे वाढलेले आयुष्य चांद्रयान-2 मोहिमेच्या पथ्यावर पडणारे असल्याचे इस्रोकडून सांगण्यात आले आहे. आधी ऑर्बिटरचे आयुष्य एक वर्ष असणार होते. पण जीएसएलव्ही प्रक्षेपकाने ऑर्बिटरला अचूक कक्षेत प्रस्थापित केले तसेच त्यामध्ये इंधन जास्त असल्यामुळे ऑर्बिटर आणखी सात वर्ष कार्यरत रहाणार आहे.

ऑर्बिटरमध्ये आठ अत्याधुनिक पेलोड आहेत. ज्यावरुन चंद्राचा नकाशा तयार करण्यात येईल तसेच चंद्रावर पाणी, बर्फ, खनिजांचा शोध घेतला जाईल. ते शोधून काढण्यासाठी इस्रोच्या तज्ञांची समिती त्यावर काम करत असल्याची माहिती इस्त्रोने ट्विटमधून दिली आहे.

लोअर ऑर्बिटमधून कॅमेर्‍याचा पुरेपूर वापर करण्याची योजना आहे. चंद्रापासून 50 किलोमीटरच्या कक्षेत गेलो तर फोटो अजून चांगले मिळतील. अजून यासंबंधी कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही. ऑर्बिटरचे साडेसात वर्षांचे आयुष्य असल्यामुळे आम्हाला संधी आहे. ऑर्बिटरमध्ये हाय रेझ्युलेशनचे उत्तम कॅमेरे बसवलेले आहेत.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!