Friday, April 26, 2024
Homeजळगावभुसावळात रेल्वेच्या यार्डात दोन कोचेसमध्ये आयसोलेशन वॉर्ड

भुसावळात रेल्वेच्या यार्डात दोन कोचेसमध्ये आयसोलेशन वॉर्ड

देशभरात कोरोना (कोविड -19) या साथीच्या आजाराने थैमान घातले असून राज्यातही रुग्णांची संख्या वाढत असल्याने या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे.
या पार्श्‍वभूमीवर मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात कोरोना विषाणूपासून बचाव व नियंत्रणासाठी उपाययोजना केल्या असून वापरात नसलेल्या पॅसेंजरच्या दोन रॅकमध्ये आयसोलेशन वॉर्ड तयार केला असून यात सुमारे 45 रुग्णांची सोय केली जाणार आहे.
भुसावळ यार्डात आयसोलेशन वॉर्ड
भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे रेल्वे यॉर्डात वापरात नसलेल्या पॅसेंजरच्या दोन रॅकद्वारे आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आला आहे. साधारण एका कोचमध्ये 24 रुग्णांची सोय करण्यात आली असून एक बाथरूम एक टॉयलेटही तयार करण्यात आला आहे. रुग्णांसोबत परीचारीका व डॉक्टरांसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे.
सोडियम हायपोक्लोराईड सोल्युशनचा वापर
रेल्वे रुग्णालयाच्या फरशा, खिडक्या, रेलिंग तसेच रेल्वे स्थानकावर प्रवासी बसण्याच्या जागांवर सोडियम हायपोक्लोराइड सोल्युशनचा वापर करून दिवसातून किमान पाच ते सहा वेळा साफसफाई व स्वच्छता करण्यात येत आहे
- Advertisment -

ताज्या बातम्या