‘इसिस’च्या संशयिताला मुंबईत अटक; उत्तर प्रदेश एटीएस पथकाची कामगिरी

0
मुंबई | दहशतवादी संघटना असलेल्या  ‘इस्लामिक स्टेट’च्या (इसिस)च्या एका संशयिताला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाकडून हि कारवाई करण्यात आली आहे.

मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर यास अटक झाली असून या संशयिताचे नाव अबु जाहिद सलाउद्दीन शेख (वय -42) असल्याची प्राथमिक माहिती आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अबु जाहिद सलाउद्दीन शेख सौदी अरेबियावरून मुंबईत रात्रीच्या सुमारास आला होता.

तो मूळ आझमगडचा असल्याचे समजते. अबु जाहिद हा दुबईतून  इसीसचे काम करत होता. त्याचे उत्तर प्रदेशमधून ताब्यात घेण्यात आलेल्या दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे बोलले जात आहे.

या घटनेनंतर उत्तर प्रदेश पोलीस दुपारी पत्रकार परिषद घेणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यानंतर अजून काही खुलासे होण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.

LEAVE A REPLY

*