Thursday, May 2, 2024
HomeनाशिकISIला माहिती पुरवणाऱ्याला हेरास नाशिकमध्ये अटक

ISIला माहिती पुरवणाऱ्याला हेरास नाशिकमध्ये अटक

नाशिक | Nashik

नाशिकस्थित एचएएल या भारतीय बनावटीची विमाने बनवणाऱ्या कंपनीची गोपनीय माहिती आय.एस.आय. या गुप्तहेर संघटनेस पुरविणाऱ्या इसमास अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

दहशतवाद विरोधी पथक नाशिक युनिटने ही कारवाई केली आहे. अधिक माहिती अशी की, एचएएल कंपनीत काम करणारा एक कर्मचारी परदेशीय व्यक्तीच्या संपर्कात असुन तो भारतीय बनावटीच्या विमानांची व त्याच्याशी संबंधीत संवेदनशील माहिती तसेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या विमाने बनविण्याच्या कारखान्या संदर्भातील गोपनीय माहिती सदर परदेशीय व्यक्ती पुरवत आहे.

दरम्यान हा कर्मचारी सिक्स टॉपमध्ये रबर आणि प्लॅस्टिक विभागात कार्यरत आहे. एटीएसचे महासंचालक देवेन भारती यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली असून या व्यक्तीकडून धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

विमान बनवणाऱ्या तांत्रिक तपशिलाची, विमान कारखान्याच्या स्ट्रक्चरची माहिती पाकिस्तानी गुप्तेहर संघटना असलेल्या आय एसआयला हा आरोपी पुरवत असल्याचा संशय आहे.

त्यावरून सदर इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे. त्याच्या ताब्यातून ३ मोबाईल हण्डसेट, ५ सिमकार्ड आणि २ मेमरी कार्ड जप्त करण्यात आले आहेत.

सदर व्यक्तीस आज रिमांडकामी संबंधित न्यायालयासमोर हजर केले असता, त्याला 19 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या