अहमदनगर : ISDT ने विद्यार्थ्यांना फॅशन डिझायनिंगचे नवे दालन सुरु केले : अनुराधा आदिक 

आरती खेलीया बेस्ट डिझायनर तर राजुल देसर्डा बेस्ट मॉडेल

0
अहमदनगर : आय.एस.डी.टी. या संस्थेने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी फॅशन डिझायानिंग व इंटेरिअर डिझायानिंगचे नवे क्षेत्र खुले असून संस्थेचे परिश्रम पाहता आगामी काळात आंतरराष्ट्रीय स्तरावरील डिझायनर्स निर्माण होतील असे मत श्रीरामपूर नगरपालिकेच्या नगरध्यक्ष अनुराधा गोविंदराव आदिक यांनी व्यक्त केला.
अहमदनगर येथील इन्सिट्युट फॉर स्टडीज इन डिझाइन अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी या संस्थेचा दहावा फॅशन शो ब्लॉसम 2018 काल सावेडील येथील माऊली संकुल येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष विनायकराव देशमुख, उद्योजिका कल्याणी गौरव फिरोदिया, प्राचार्या दिपाली तेलंग, अंतरप्रीत धुप्पार, संचालिका पुजा देखमुख, उपप्राचार्या कविता सुरतवाला, माजी नगरसेविका अर्चना पानसरे, इंटेरिअर डिझाईन विभाग प्रमुख अरूण गावडे आदी उपस्थितीत होते.
कल्याणी फिरोदिया यांनी यासंस्थेच्या उपक्रमांना व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात पाच राउंड सादर करण्यात आले.यावेळी मोठ्या संख्याने पालक विद्यार्थी उपस्थितीत होते. या कार्यक्रमांच्या यशस्वतीतेसाठी प्राचार्य दिपाली तेलंग, अरूण गावडे, गौरी देशपांडे, रूपाली बलदोटा, उमेश गुगुल, पूजा पतंगे, अंजु बठेजा यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभार विणा दिघे यांनी मानले.
निकाल पुढील प्रमाणे : बेस्ट मॉडेल पुरस्कार प्रथम राजुल देसार्डा, व्दितीय इतीषा मुनोत, बेस्ट डिझायनर प्रथम आरती खेलीया, व्दितीय काजल जबुवानी, तृतीय मुस्कार पठाण. बेस्ट अ‍ॅक्सेसरीज पुरस्कार कोमल बीडकर, बेस्ट एस.ओ.टी. प्रथम शुभदा डोळसे, व्दितीय आरती असनानी, बेस्ट थीम पुरस्कार मिस्टेरीअस आर्ट या संकल्पनेस देण्यात आला.

LEAVE A REPLY

*