Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

तुमची मुलगी बारावी पास झाली आहे का? उच्च शिक्षणासाठी ‘ते’ देतायेत बिनव्याजी कर्ज

Share

नाशिक | प्रतिनिधी

बारावीच्या निकालामध्ये पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली असून, मुलींच्या शिक्षणाचा टक्का वाढत चालला आहे. एकीकडे हे आशादायी चित्र असतांना दुसरीकडे मात्र पालकांचा मुलींच्या उच्च शिक्षणाबद्दलचा कल मुलांच्या शिक्षणापेक्षा कमी आहे.  यामागे विविध कारणे आहेत. मात्र यावर उपाय म्हणून गेल्या ५ वर्षांपासून नाशिक येथील तैनवाला फाऊंडेशन आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींच्या उच्च शिक्षणसाठी मदतीचा हात देत आहे. आजवर १०० पेक्षा अधिक मुलींना त्यांनी आर्थिक मदत केली आहे.

मुलींच्या लग्नाची घाई करणे, यामुळे शिक्षणात अनावश्यक खंड पडणे. लग्न झाल्यानंतर मुलगी दुसऱ्या घरी जाणार मग तिच्या शिक्षणावर पैसे खर्च करण्यापेक्षा मुलाच्या शिक्षणावर पैसे खर्च करू अशी मानसिकता यामागे आहे.

तर काही मुलींची मुळातच कौटुंबिक आर्थिक स्थिती नाजूक असल्यामुळे उच्च शिक्षणापासून त्यांना वंचित रहावे लागते. यामुळे या सामाजिक संस्थेने पुढाकार घेत मुलींच्या शिक्षणासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शिवली आहे.

ही आर्थिक मदत विना व्याज शैक्षणिक कर्ज असून मुलीने स्वतःच्या शिक्षण पूर्ण करून रोजगार मिळवल्यानंतर त्याची परतफेड करावयाची आहे. ज्यामुळे त्यांच्या मनात देखील सामाजिक जाणीव निर्माण होऊन, अर्थ सहाय्याचे हे चक्र असेच सुरु राहील.  यातून वंचित मुलींना उच्च शिक्षण घेता येईल.’ अशी माहिती संस्थेच्या विश्वस्तांनी दिली.

विद्यार्थिनीच्या कुटुंबाचे वार्षिक आर्थिक उत्पन्न ३ लाखांपेखा कमी असावे  तसेच विद्यार्थिनीला ७४ टक्के पेक्षा अधिक गुण असावेत. अधिक माहितीसाठी तैनवाला फाउंडेशन, सी/ओ सॅमसोनाईट साऊथ एशिया प्रा. ली. गट नं. १५९ ते १६३, गोंदे दुमला, ता. इगतपुरी जि. नाशिक येथे संपर्क साधावा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!