Type to search

आवर्जून वाचाच नाशिक मुख्य बातम्या हिट-चाट

इरफान खान नाशिकमध्ये करणार दिवाळी साजरी

Share
मुंबई : अभिनेता इरफान खान लवकरच भारतात परतणार असून यंदाची दिवाळी तो नाशिकमध्ये साजरा करणार आहे. इरफानला न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर neuroendocrine tumour हा दुर्धर आजार असून लंडनमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मार्च महिन्यापासून इरफान लंडनमध्येच असून दिवाळीसाठी तो दहा दिवस भारतात येणार आहे. नाशिक इथल्या फार्महाऊसमध्ये कुटुंबीयांसोबत इरफान दिवाळी साजरी करणार आहे.

इरफानचे उपचार पूर्णपणे संपले नाहीत. पण उपचारादरम्यान १० दिवसांचा बे्रक घेऊन तो भारतात येणार आहे. भारतात काही दिवस घालवल्यानंतर तो पुन्हा लंडनला परतेल.  मध्यंतरी इरफान मुंबईत परतून ‘हिंदी मीडियम 2’चे शूटींग सुरू करणार, अशी बातमी होती. पण इरफानच्या प्रवक्त्याने ही बातमी निव्वळ अफवा असल्याचे म्हटले होते.

माहितीनुसार,अद्याप डॉक्टरांनी इरफानला पूर्णपणे काम करण्याची परवानगी दिलेले नाही. पण येत्या मार्चपर्यंत इरफान कामावर परतू शकेल, असे मानले जात आहे. पण यादरम्यानही त्याला डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!