Friday, May 3, 2024
Homeनगरलोखंडी गज सोबत फिरणार्‍या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

लोखंडी गज सोबत फिरणार्‍या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शहरात लोखंडी गज सोबत घेऊन फिरणार्‍या एका तरुणाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

श्रीरामपूर शहरातील वॉर्ड. नं. 6 मधील कांदा मार्केट परिसरात रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास 20 किलो वजनाच्या लोखंडी गजासह पोलिसांनी एका तरुणाला पकडले. याबाबत विचारणा केली असता त्याला मुद्देमालाबाबत काहीही सांगता आले नाही. त्यामुळे पोलीस नाईक रघुनाथ कारखिले यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली.

या फिर्यादीवरून रवींद्र प्रभाकर मांजरे (वय 23, रा. देवकरवस्ती, अशोकनगर) याच्याविरूद्ध शहर पोलिसांत महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 124 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक श्री. पंडित पुढील तपास करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या