या धिप्पाड गड्याला सैनिक होऊन करायचाय इसिसचा खात्मा

0
तेहरान | वृत्तसंस्था :  ऍनिमेशनपटांमध्ये अनेक ‘बॉडीबिल्डर’ नायक दाखवले जातात. अशाच पिळदार शरीरयष्टीच्या, धिप्पाड नायकांप्रमाणेच एक माणूस इराणमध्ये आहे.

२४ वर्षांच्या या व्यावसायिक पॉवर लिफ्टरचे नाव आहे सजाद. त्याच्या पिळदार स्नायूंमधून त्याची मानच दिसत नाही, अशी स्थिती आहे. लोक त्याला हर्क्युलिस आणि हल्क म्हणून संबोधतात. सैनिक बनून जगातून ‘इसिस’चा नायनाट करण्याचे त्याचे स्वप्न आहे.

१७५ किलो वजनाच्या सजादचे सोशलमिडियात लाखो फोलोअर्स आहेत. त्याची मान दिसत नसल्यानेही तो सतत चर्चेत असतो. सैन्यात भरती होण्याची त्याची महत्त्वाकांक्षा आहे. इन्स्टाग्रामवर त्याने आपले फोटो शेअर केल्यानंतर तो चर्चेत आला होता. सध्या वेटलिफ्टिंग हे त्याचे करिअर आहे.

इतका धिप्पाड देहाचा असला तरी स्वभावाने तो मृदू आहे. अनेकजण त्याला पाहून घाबरतात आणि ते पाहून त्याला वाईट वाटते. त्याच्या धिप्पाड देहामुळे दैनंदिन जीवनातही काही समस्यांचा त्याला सामना करावा लागतो.

विशेषतः कारमध्ये बसता येत नाही, याचे त्याला नेहमी वैषम्य वाटते. मात्र जगातील सर्वात शक्तीशाली माणसांपैकी आपण एक आहोत, याचा त्याला अभिमानही आहे.

LEAVE A REPLY

*