आज कोलकाता भिडणार राजस्थानशी

0
आज बलाढ्य कोलकाताचा सामना राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. इडन गार्डनवर असलेला हा सामना रात्री ८ वाजेपासून रंगणार आहे.

कोलकाता दोन वेळा आयपीएलचा विजेता ठरला आहे. आपल्या घरच्या मैदानावर दिनेश कार्तिक आपल्या विजयाची घोडदौड सुरु ठेवण्याठी प्रयत्न करेल तर तिकडे राजस्थान रॉयलचा कर्णधार अजिंक्य रहाणे प्लेऑफ मध्ये येण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहे.

कोलकाता टीमने सुरुवात दमदार केली होती पण काही सामन्यांमध्ये त्यांना सातत्य ठेवता आले नसल्याने पराभवाला सामोरे जावे लागले. राजस्थानचीदेखील अशीच अवस्था असून करा किंवा मरा असाच हा सामना असणार आहे.

कोलकाता संघाला जॉस बटलरला बाद करण्यासाठी योग्य ती रणनीती आखावी लागणार आहे.

केकेआर मजबूत बाजू : क्रिस लीन, सुनील नारायण, रॉबिन उथप्पा, दिनेश कार्तिक, नितीश राणा, शुभमन गिल.

गोलंदाज पियुष चावला, सुनील नारायण, कुलदीप यादव, कृष्णा, शर्ल्स, रसेल,

राजस्थानची टीम 

अजिंक्य रहाणे, जॉस बटलर, संजू समसन, जोफ्रा आर्चर, कृष्णाप्पा गौतम, जयदेव उनाडटक, बेन स्टोक्स,

आतापर्यंतचे सामने :

राजस्थान रॉयल्स विजयी  – ९

कोलकाता नाईट रायडर्स   – ६

खेळपट्टीचा अंदाज 

हिरव्यागार खेळपट्टीवर फलंदाजांना मोठी कसरत करावी लागणार असून गोलंदाजांना मात्र या खेळपट्टीचा फायदा होणार आहे. याठिकाणी तुरळक पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

  • सलील परांजपे, नाशिक

LEAVE A REPLY

*