Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याIPL-2022 : बंगळुरूचा गुजरातवर विजय

IPL-2022 : बंगळुरूचा गुजरातवर विजय

मुंबई | प्रतिनिधी ( Mumbai )

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आयपीएल-२०२२ (IPL-2022) चा क्रिकेटचा सामना आज गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅॅलेंजर्स बेंगलोर ( Gujrat Titans Vs Royal Challengers Bangalore ) यांच्यात खेळण्यात आला. यात बेंगलोरच्या संघाने बाजी मारली.

- Advertisement -

गुजरातच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरातच्या संघाकडून सलामीस वृद्धिमान शहा व शुभमन गिल फलंदाजीस आले. सामन्याच्या तिसऱ्या षटकात जॉश हेझलवूडच्या गोलंदाजीवर ग्लेन मॅॅक्स्वेलने शुभमन गिलला अवघ्या १ धावावर झेल बाद करत तंबूत पाठविले. मॅथ्यू वेड १३ चेंडूत १६ धावा करून पायचीत झाला. फाफ डूप्लेसीने वृद्धिमान शहाला धावचीत केले. वृद्धिमान शहाने २२ चेंडूत ३१ धावा केल्या. हार्दिक पंड्या आणि डेविड मिलरच्या जोडीने धडाकेबाज फलंदाजी केली. डेविड मिलरने २५ चेंडूत ३३ धावा करत हसरंंगाकडून झेलबाद झाला. दिनेश कार्तिकने राहुल तेवतीयाला २ धावांवर झेलबाद करत माघारी पाठविले. हार्दिक पंड्याने ४७ चेंडूत ३ षटकार व ४ चौकार लगावत अर्धशतक पूर्ण करत एकून नाबाद ६७ धावा केल्या. २०व्य षटका अखेर गुजरातच्या संघाने ५ गडी बाद १६८ धावा केल्या.

गुजरातच्या संघाने दिलेल्या १६९ धावांचे आव्हान स्वीकारत बेंगलोरच्या संघाकडून सलामीस विराट कोहली व फाफ डूप्लेसी फलंदाजीसाठी मैदानात आले. सलामीच्या खेळाडूंनी धडाकेबाज फलंदाजीस सुरवात केली. पंधराव्या षटकात बेंगलोरच्या संघाचा पहिला खेळाडू बाद झाला. रशीद खानच्या गोलंदाजीवर हार्दिक पंड्याने फाफ डूप्लेसीला झेल बाद केले. फाफ डूप्लेसीने ३८ चेंडूत ४४ धावा केल्या. विराट कोहलीने ५४ चेंडूत ७३ धावा केल्या.मॅथ्यू वेडने विराट कोहलीला स्टंप आउट केले. ग्लेन मॅॅक्स्वेलने १८ चेंडूत नाबाद ४० धावा केल्या.

बेंगलोरच्या संघाने ८ चेंडू शिल्लक ठेवत व ८ गडी राखून गुजरातच्या संघावर विजय मिळविला.

- Advertisment -

ताज्या बातम्या